ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जनावर

नेवासा – शहरातील इदगाह मैदानाच्या काटवनात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या २३ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे सदर घटने बाबत पो.ना.शहाजी बाबासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.29/05/2024 रोजी रात्री 10/30 वा चे सुमारास मी, पोसई श्री मनोज आहीरे सो, पोहेकॉ कुसळकर, पोना माने, पोना काळोखे, पोकॉ आव्हाड असे सर्व नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर असतांना पो.नि धनंजय जाधव यांनी त्याचे कार्यालयात बोलावुन कळविले की,

खुपटी रोड येथील इदगाह मैदान काटवनात महाराष्ट्र राज्यमध्ये गोवंश जनावराची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवलेली आहेत आता गेल्यास मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनतर पोसई मनोज अहीरे यांना कार्यवाही करण्यास कळविल्याने लागलीच आम्ही खाजगी वाहनासह नेवासा पोलीस स्टेशन येथुन निघून पोसई मनोज आहीरे यांनी लागलीच दोन पंचाना बोलावुन घेतले. पंचाना बातमीतील हकिगत सांगुन छापाकामी पंच म्हणुन समक्ष हजर राहण्यासाठी कळविले असता त्यास पंचानी समंती दिल्याने आम्ही पोलीस स्टाफ व पंच खाजगी वाहनाने लिखान कामाचे साहित्य घेवुन रवाना होवुन बातमीतील नमुद ठिकाणचे अलीकडे थोडे अंतरावर आमची वाहने उभे करुन खात्री केली असता खुपटी रोड येथील इदगाह मैदान काटवनात 23 लहान मोठी गोवंश जनावरे बांधलेली दिसली सदर ठिकाणी गोवंश जनावराचा मालकाचा शोध घेतला असता मिळुन आला नाही .

तरी दि.29/05/2024 रोजी रात्री 10/30 वा.चे सुमारास नेवासा शहरातील खुपटी रोड येथील इदगाह मैदानाच्या पाठीमागे असलेल्या काटवनात महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तल करणेची मनाई असतांनाही एकुण 386000/- किंमत रु किं.चे गोवशीय 23 लहान मोठी जनावरे कत्तल करण्याचे उददेशाने बांधुन ठेवुन त्यांना अमानुषपणे वागवुन, विना चारापाण्याचे ताब्यात ठेवुन त्याची कत्तल करण्याचे उददेशाने कोणीतरी अज्ञात इसमाने बांधुन ठेवले म्हणुन माझी अज्ञात इसमाविरुध्द महाराष्ट पशु संरक्षण सुधारण अधिनियम सन 1995 चे सुधारीत सन 2015 कलम 5,5 (अ) (ब), 9 (ब), सह प्राण्याना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3,11 प्रमाणे फिर्याद आहे.

newasa news online
जनावर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनावर
जनावर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनावर
error: Content is protected !!