ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मतदान

हिवरी मतदान केंद्रामध्ये दुपारी कर्मचारी जेवायला बसल्याने मतदारांना तब्बल 25 मिनिटे बाहेर ताटकळत बसावं लागल्याची घटना घडली. 

बँकेत वा कोणत्याही सरकारी कार्यालयात जर तुम्ही कामानिमित्त दुपारी गेला आणि नेमकं त्याचवेळी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ झाली तर तुम्हाला ताटकळत रहावं लागत. आपलं काम असल्याने कितीही वैताग आला तरी काही बोलता येत नाही. पण बँकेचा हा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातल्या मतदारांना मतदान केंद्रावर आला. यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्र (Yavatmal Hiwari Polling Station) हे जेवणासाठी सुमारे 25 मिनिटे बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे आपली कामं बाजूला सारून लोकशाहीचं कर्तव्य बजावण्यास गेलेल्या मतदारांना मात्र चांगलच ताटकळत बसावं लागलं. 

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघसाठी मतदान सुरू असताना यवतमाळच्या हिवरी येथे मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदानाच्या वेळेत कर्मचारी हे मतदान केंद्राच्या आतच भोजनासाठी बसल्याने दुपारी 2.10 ते 2.35 असे 25 मिनिटं मतदान प्रक्रिया बंद होती. त्यावेळी मतदानासाठी आलेल्या वृद्ध महिला आणि इतर नागरिक हे ताटकळत केंद्राच्या बाहेर बसले होते. कर्मचाऱ्यांचं भोजन झाल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दरम्यान मतदानासाठी आलेल्या महिला आणि पुरुष मतदारांना ताटकळत बसून राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग आता या मतदान केंद्रावर काय कारवाई करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. 

मतदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदान
मतदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदान
Share the Post:
error: Content is protected !!