ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाविकास

नेवासा – महविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत नेवासा येथे गुरुवारी दि.२ मे रोजी श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.
          नेवासा येथे भाऊसाहेब वाकचौरे यांचे आमदार शंकरराव गडाख यांच्या समवेत आगमन झाल्यानंतर त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत नेवासा नगरीचे गामदैवत श्री मोहिनीराजांचे दर्शन घेतले. शिर्डी लोकसभा मतदान संघाचा विकास होण्यासाठी आम्हाला विजयश्री प्राप्त होऊ द्या असे साकडे त्यांनी श्री मोहिनीराजांना घातले.
     यावेळी श्री मोहिनीराजांच्या मंदिरासमोर आमदार शंकरराव गडाख,भाऊसाहेब वाकचौरे,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना,रामदास गोल्हार,हरिभाऊ शेळके,रावसाहेब कांगुणे,मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले,रामभाऊ जगताप,लक्ष्मण जगताप, अंबादास लष्करे,तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के,शहराध्यक्ष नितीन जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे,संदीप मोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.शोभाताई पातारे, राष्ट्रवादीचे काकासाहेब शिंदे,डॉ.अशोकराव ढगे,आम आदमी पार्टीचे राजू आघाव,अँड.सादिक शिलेदार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अँड.बन्सी सातपूते,यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

महाविकास


  यावेळी निघालेल्या रॅलीत चौकाचौकात व नेवासा शहरातील मुख्य पेठेत आमदार शंकरराव गडाख व उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे फटाक्यांची अतिषबाजीने व्यापारी व सर्वधर्मीय बांधवांनी हार घालून सत्काराच्याद्वारे स्वागत केले.माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार,रहेमानभाई पिंजारी यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करत स्वागत केले.यावेळी निघालेल्या रॅलीत नारायण लोखंडे,दिलीप जामदार, दिलीप सरोदे,वकील संघाचे अध्यक्ष अँड.कल्याण पिसाळ सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,नगरसेवक रणजित सोनवणे,राजेंद्र मापारी, संदीप बेहळे,दिनेश व्यवहारे,सचिन नागपुरे,जितेंद्र कु-हे, अंबादास ईरले, जालिंदर गवळी,पंकज लांभाते,वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे,इम्रान दारुवाले, रामकृष्ण कांगुणे,राजेंद्र घोरपडे,राहुल देहाडराय,गणेश कोरेकर,बाळासाहेब वाघ,निलेश कडू,गणेश शेंडे,गणेश झगरे यांच्यासह महाविकास आघाडी मित्र पक्षाचे पदाधिकारी सदस्य, नेवासा येथील सर्वधर्मीय नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
   नेवासा येथील चव्हाण कॉम्प्लेक्स प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविकास
महाविकास

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाविकास
महाविकास

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाविकास
Share the Post:
error: Content is protected !!