ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वडाळा

वडाळा बहिरोबा – तब्बल ३१ वर्षांनी माजी विद्यार्थी – विद्यार्थींनींनी आपल्या हायस्कुलमध्ये दाखल होत शाळेची घंटा झाल्यावर माजी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली राष्ट्रगीत झाले आणि वर्गात गेल्यावर माजी शिक्षिका – शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांची हजेरीही घेतली अन् जुन्या आठवणींना अखेर उजाळा मिळाला आपल्या वर्गातील काही वर्गमिञ नोकरीकामी बाहेर असल्यामुळे थेट वर्गातून त्यांच्याशी व्हिडीओ कॉलव्दारे संभाषण केले आणि उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून दोन हजार लिटर सिंटेक्स टाकी देण्याचा संकल्प करत एक हजार अंब्याची रोप विद्यालयाच्या प्रागंणात लावण्यासाठी वाटप केले.

वडाळा (बहिरोबा) येथील रुरल हायस्कुलच्या सन १९९२ – ९३ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेंहमेळाव्याचे आयोजन विद्यालयात करुन नंतर एकञित स्नेंह भोजनाचा आनंद लुटत माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना वाट मोकळी करुन देत सद्य परिस्थितीत एकमेकांची वाटचाल जाणून घेतली. विद्यालयातील कार्यक्रम आटोपून २४ × ७ हॉटेल फुडमॉल रिसॉर्टवर एक बैठकही घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.जे.पवार होते यावेळी बोलतांना पवार म्हणाले की,आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेंह मेळावा आयोजित करुन दिवंगत शिक्षकांना आदरांजली वाहून एक प्रेम आणि आपुलकीची भावना कायम राखली हीच खरी गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले,

यावेळी या स्नेंह मेळाव्यास पनवेल,नाशिक,करंजी,पुणे,पाथर्डी,नगर या ठिकाणी नोकरी निमित्त बाहेरगांवी असलेले सुमारे ८० विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित राहीले आणि जे आपले जुने सहकारी येवू शकले आणि त्यांच्याशी व्हिडीओ कॉलव्दारे संभाषण करुन आजही धकाधकीच्या जीवनात आपली खरी मैञी जोपासली हीच खरी आभिमानाची बाब असल्याचे माजी शिक्षकांनी आपले विचार मांडतांना यावेळी सांगितले.

वडाळा

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार माडतांना देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडण्यास विसरतो त्यांनाच ‘तो’ मिञ – मैञिण म्हणून आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने पाठवत असतो आणि हेच ऋणानुबंध जोपासण्यासाठी वडाळा (बहिरोबा) येथील रुरल हायस्कुलच्या माजी वर्गमिञ – मैञिणी चक्क तब्बल ३१ वर्षांनंतर एकमेकांना भेटले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा शिक्षकांसमोर शाळा भरवत माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसाडूंन वाहत असतांनाच जुन्या मिञांच्या सहवासात एकमेंकांची सद्य परिस्थिती जाणवून घेत एक आपुलकीची भावना कायम ठेवत मैञीचे नाते पुन्हा एकदा घट्ट केले एकमेकांना फेटे बांधत आनंदाच्या वातावरणात हा मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास शिक्षिका साठे, गायकवाड,मगर,बडे मॅडम शिक्षक गायकवाड,बडे,मकासरे,चव्हाण,तिजोरे,माने,आहेर, शिपाई सोनवणे, लुकस तिजोरे,

मोहन जाधव,शशिकांत वाघमारे,मकासरे आदी उपस्थित होते तर माजी विद्यार्थी विठ्ठल बडगू,अमृत पतंगे,छाया चव्हण,बापूसाहेब आवारे, मिना दिघे,काका कदम,संजय शेळके,रविकांत गायकवाड,अनिता ढूस,विजया गणगे,उमेश सोमवंशी, पप्पू पतंगे,वर्षा सोनकांबळे,गोविंद गायकवाड,धनंजय गायकवाड,शिवाजी मोटे,संतोष नवगिरे यांच्यासह माजी विद्यार्थी – विद्यार्थींनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत मोटे यांनी केले तर सुञसंचालन रावसाहेब मोटे आणि आभार कमलेश मेहेर यांनी मानले.

वडाळा
वडाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वडाळा
वडाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वडाळा
error: Content is protected !!