ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हिंदू

नेवासा – दि.९ जून रोजी जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी कटरा ते शिव खोडी येथे जात असताना पाक जिहादी दहशतवादयांनी केलेल्या हिंदू भाविकांच्या बसवरील यात्रेकरूंवर केलेल्या क्रूर हल्याचा नेवासा येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध  केला असून केंद्र सरकारने अशा प्रकारच्या कारवाया पूर्णत: नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णायक आणि कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

नेवासा पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे की  इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दहा निष्पाप हिंदू यात्रेकरू मारले गेले,संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना असून या क्रूर गुन्ह्यामुळे संपूर्ण देश दुखावला आहे.बराच काळापासून जम्मू-काश्मीरला पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा सामना करावा लागत आहे, कलम ३७० हटवल्यानंतर आशेचा किरण निर्माण झाला आहे, पण दहशतवाद्यांचे मनोधैर्य अजून कमी झालेले नाही, हिंदूंना खुणावून मारण्याच्या घटना वाढल्या आहेत,  या सगळ्यामागे पाकिस्तानचा हात आहे.

देशाच्या नव्या सरकारच्या शपथविधीवेळी असे धाडसी कृत्य करून इस्लामी दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे.बजरंग दलाने मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण केली परंतु या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला, केंद्र सरकारने अशा प्रकारच्या कारवाया पूर्णत: नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णायक आणि कठोर पावले उचलावीत आणि अशा घटकांना आश्रय देणाऱ्या अंतर्गत आणि परदेशी घटकांवरही कठोर आणि योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे सदरचे निवेदन महामहिमा राष्ट्रपती ,जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले  आहे. निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषदेचे नेवासा तालुका प्रखंड प्रमुख प्रशांत बहिरट,आकाश गायकवाड,शुभम गव्हाणे,उमेश ठाणगे आदि उपस्थित होते.

हिंदू
हिंदू
हिंदू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हिंदू
हिंदू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हिंदू
error: Content is protected !!