ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पीक


पाचेगाव –महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाबीज बियाणे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पीक तंत्रज्ञान प्रशिक्षण बेलपिंपळगाव येथे संपन्न झाले. यावेळी जगदीश खोडक विभागीय व्यवस्थापक महाबीज जालना, भाऊसाहेब सोनवणे प्रभारी तालुका कृषी अधिकारी नेवासा, सुनील फिरके, जिल्हा व्यवस्थापक महाबीज अधिकारी, राम ढोकणे मंडळ कृषी अधिकारी नेवासा,महाबीज जिल्हा कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर ,कृषी पर्यवेक्षक विलास जाधव, श्रीमती सुनिता पुजारी, महाबीज तालुका क्षेत्र अधिकारी सोनाली पांढरे, सरपंच कृष्णा भाऊ शिंदे, चंद्रशेखरजी गटकळ,कृषी सहाय्यक निलेश बिबवे, वैभवजी वैराळ तसेच उपसरपंच व सदस्य सामाजिक कार्यकर्ते वसंतरावजी कांगोणे,

अशोक कारखान्याचे संचालक अमोल कोकणे,शेतकरी गटाचे दत्तात्रय राऊत, नंदकुमार राऊत, विलासराव चौगुले, भारत चौगुले, मनीष कांगुणे, प्रकाश मेहत्रे, विलास सरोदे, शेतकरी सेवा चे देवतरसे,गणेश धिरडे किरण कोठुळे, अशोक तरस, शहाजी धिरडे, वसंतराव रोटे, अण्णासाहेब वैद्य, महाबीज बीज उत्पादक शेतकरी-श्री गवळी, श्री मंडलिक,श्री. हिरवे श्री.शिंदे, अशोक तूवर, रमेश शिंदे, महेश पांढरे आधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीक


यावेळी जगदीश खोडक यांनी महाबीज बियाण्याचे बीजोत्पादनचे महत्त्व मिळणारा तसेच मिळणारा अतिरिक्त भाव सोयाबीनचे विविध वाण व त्यांची वैशिष्ट्ये तसेच जैविक बुरशीनाशक व खते वापरून उचित उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे ठरतील असे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी बांधवांनी बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. धनंजय हिरवे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात नेवासा तालुक्यात विविध तंत्रज्ञान मोहिमा राबविल्या जात आहे. यानिमित्त आज प्र तालुका कृषी अधिकारी नेवासा भाऊसाहेब सोनवणे यांनी खरीप पिक उत्पादन आराखडा नियोजन जनजागृती कार्यक्रम तसेच खते बी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी भरारी पथकांचे केलेले नियोजन व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी बीजे प्रक्रिया प्रात्यक्षिक बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दाखविण्यात आले. कृषी विभाग व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट बीजोत्पादक शेतकरी सन्मान १० शेतकऱ्यां चा करण्यात आला.तसेच शेतकरी बांधवांना जमीन आरोग्य पत्रिका व शेती शाळा किट वाटप करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतचे निलेश कांगणे,सुदाम लंगे, आकाश गटकळ, आदींचे सहकार्य लाभले कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी शेतकरी बांधवांचे सर्व आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटाचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांचे सर्वांचेआभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पीक
पीक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पीक
पीक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पीक
error: Content is protected !!