ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गणवेश

नेवासा – गेल्या जून महिन्यात शाळेची घंटा वाजली आणि हजारो विद्यार्थी शाळेत दाखल झाले मात्र ग्रामीण भागात असलेल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना महिनाभरा नंतर हि या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तर उपलब्ध नसल्याने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन भूमिशी नाळ जोडलेले पुणे येथील कांदे कुटूंबियांनी श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय नेवासे बुद्रुक येथे सुमारे दिड लाख रुपयांचे शालेय गणवेश व दप्तर वाटप केले आहे.

अनिलरावं आदिनाथ कांदे व निखिल अनिलरावं कांदे पाटील यांच्या संकल्पनेतून हा आभिनव उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमा मुळे कांदे कुटुंबातील सदस्यांचे सर्वच स्थारतून अभिनंदन करण्यात येत आहे.

गणवेश

यावेळी अनिलराव कांदे म्हणाले की मला व माझ्या सर्व कटुंबाला समाजिक कार्याची आवड आहे याच शाळेत आणखी काही गरजू विद्यार्थ्यांची वर्ष भराची शाळेची फी त्याच्या अडचणी असतील त्या देखील त्यांनी सांगाव्यात आपल्या हातून जितेके जास्त सामाजिक कार्य होईल तेवढे करु तिरुपती ग्रुप च्या माध्यमातून कामे सुरू आहे पैसा हा आयुष्यात गौण आहे माणुसकी धर्म जीवनात महत्वाचा घटक आहे असेही कांदे म्हणाले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी उपस्थित होते.


काही विद्यार्थ्यांच्या च्या अंगात गणवेश होता तर काहींच्या नव्हता ग्रामीण भागात ही परिस्थिती आहेच मात्र अश्या वेळी कांदे कुटुंबिय यांनी हा मदतीचा हात दिल्याने नक्कीच हि शाळा भविष्यात उजवलं भविष्या कडे वाटचाल करेल.
शंतनु हापसे
विश्वस्त. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था.


सामाजिक जीवनात जगत असताना आपण कुठंतरी समाजच देण लागतो हिच भावना मनी ठेऊन आज आम्ही हा आभिनव उपक्रम हाती घेतला यापुढे देखील अशी कामे तिरुपती ग्रुप कडून होईल.
अनिलरावं कांदे पाटील
तिरुपती ग्रुप पुणे.

गणवेश
newasa news online
गणवेश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गणवेश
गणवेश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गणवेश
error: Content is protected !!