ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन

नेवासा – आज अहमदनगर येथे जिल्हा परिषदेवर अहमदनगर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून बांधकाम कामगार उपस्थित होते या आंदोलनाचे नेतृत्व समर्पण मजदूर संघ अहमदनगर व इतर समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक संघटनेच्या विरोधामुळे ग्रामविकास अधिकारी हे बांधकाम मजुरांना 90 दिवस काम केल्याचे दाखले देत नाहीत. याबाबत संघटनांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा व पत्र व्यवहार केला असता जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना तातडीने दाखले देण्याचे आदेश निर्गमित केले परंतु तरीही ग्रामसेवकांनी दाखले दिले नाही

आंदोलन

यामुळे बांधकाम मजूर बांधवांना त्यांना मिळत असलेल्या 28 शासकीय योजनांपासून मुकावे लागत आहे. आरोग्य विमा, मयत विमा, शिष्यवृत्ती यासारख्या लाभांपासुन गरीब मजूर वंचित राहत आहे. ग्रामसेवकांचे हे कृत्य म्हणजे संघटित गुन्हेगारी आहे असे मत बांधकाम कामगारांचे झाले आहेत. वरिष्ठांचे आदेश असूनही ग्रामसेवक दाखले देत नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच काही ग्रामसेवकांच्या कृपाशीर्वादामुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बनावट बांधकाम कामगार नोंदी झाले आहे.

अशा बोगस बनावट बांधकाम कामगारांवर कार्यवाही करून त्यांनी लाटलेल्या योजनांची वसुली करावी या मागण्यांसाठी आज दिवसभर बांधकाम कामगार हे पडत्या पावसात धरणे आंदोलन करत बसून होते. यापुढील आंदोलनात दाखले न देणाऱ्या ग्रामसेवकास बांधकाम मजुरांकडून गाव बंदी करण्याचा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला.
यावेळी राहुरी शेवगाव श्रीगोंदा श्रीरामपूर नगर तालुका नेवासा पाथर्डी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कामगार हजर होते. आंदोलनासाठी विविध ठिकाणावरून आलेल्या महिलांची संख्या ही लक्षवेधी होती.

जिल्हा परिषदेच्या मधल्या दरवाजावर आरक्षित असलेली जागा मजुरांच्या मोठ्या संख्येमुळे कमी पडली. त्यामुळे मजूर नाईलाजाने उघड्यावर बसले. बांधकाम मजुरांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रहदारीची कोंडी झाली. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे व पोलिसांची बराच वेळ तारांबळ उडाली.

आंदोलन
newasa news online
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन