ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रस्ता

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे गुरुवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटून परिसरातील काहिक झाडे पडली.त्यात पाचेगाव-पाचेगाव फाटा या मेन रस्त्यावर देखील असेच एक मोठे झाड वाऱ्यात पडले.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप होऊ नये या चांगल्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे व्यायाम करणाऱ्या तरुणांनी दिला.
पाचेगाव येथून पाच महिन्यापासून ही दहा ते पंधरा तरुणांची टीम पहाटेच्या वेळेस व्यायामासाठी जाती.विशेष म्हणजे दर सोमवारी सायकल फेरी मारीत व्यायाम बरोबर ते धार्मिक ठिकाणी देखील भेट देत असतात,त्यात जवळपास देवगड,गणेश खिंड,ज्ञानेश्वर मंदिर,नेवासा,शिंगणापूर,संकटेश्वर मंदिर,जैनपूर अश्या अनेक धार्मिक ठिकाणी भेटी देऊन दर्शन घेतात.

रस्ता

त्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास व्यायाम जात असताना वाटेत एक झाड पडलेले दिसले,त्यात शेजारी राहत असणारे काशिनाथ सुरोशे यांच्या कडून झाड तोडण्यासाठी लागणारे आवश्यक हत्यारे घेऊन सर्व जण झाडाला तोडून व्यवस्थित रित्या रस्ता येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोकळा करून दिला.त्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी या चांगल्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले.
यात डॉ वाल्मिक तुवर,भास्कर शिंदे,तुषार जाधव,योगेश तुवर,दत्तात्रय सुपेकर,गणेश माकोणे,संतोष तुवर,ऋषिकेश पुंड,प्रशांत शेजुळ,अरुण गायकवाड, विशाल पाटील,कांतीलाल जाधव,गणेश पवार,बाबुराव तुवर,गोविंद नांदे व भानुदास मगर, इत्यादी तरुणांनी हे चांगले कार्य करीत एक आदर्श निर्माण केला आहे.

रस्ता
रस्ता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता
error: Content is protected !!