ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

लाल किल्ला

नेवासा – भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू या शहरामधील एक महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू तावी स्थानकाचे महत्व अलिकडच्या काळात मोठे वाढलेले असून जम्मू या मार्गावरील जम्मूतावी हे भारताच्या सरहद्दीवरील अखेरचे रेल्वे स्थानक असून नेवासा (जि.अ.नगर) येथील ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरु जॉन गुलदेवकर यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद भाविकांनी लुटण्यासाठी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्या भाविकांना विरंगुळा मिळावा म्हणून नेवाशाचे महिला – पुरुष,युवक – युवती भाविकांना थेट जम्मू काश्मीरमध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी १० दिवसांची सहल काढण्यात आलेली होती या दौऱ्यात भाविक – भक्तांनी मोठ्या आनंदात हा दौरा यशस्वी करुन पुन्हा भाविक नेवासा येथे माघारी परतलेले असून या दौऱ्यात अनेक ठिकाणी त्यांनी भेटी निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटल्याचे यावेळी भाविकांनी सांगितले.

लाल किल्ला


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटविल्यामुळे भारतीय नागरीकांना आता थेट जम्मू काश्मीरमध्ये भयमुक्तपणे संचार करता येत असून नेवासा येथील भाविक या सहलीमध्ये थेट जम्मू काश्मीर,दिल्ली असा प्रवास करुन थेट जम्मूवरुन विमानाने दिल्लीला रवाना होवून पुन्हा दिल्ली ते बेलापूर रेल्वे प्रवास करुन सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुखरुप माघारी परतले असल्याची माहीती धर्मगुरु जॉन गुलदेवकर यांनी दिली.
नेवासा येथून अनेक महीला – पुरुष,युवक – युवती भाविक – भक्तांनी जम्मू काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद व्दिगुणीत केलेला आहे तसेच ग्रामिण भागातील भाविकांनी थेट जम्मूवरुन दिल्ली असा विमानसेवेचा प्रवास करुन दिल्ली दाखल होवून लाल किल्ला पाहण्याचा आनंद लुटून पुन्हा दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करत बेलापूर रेल्वे स्थानकावर सुखरुप माघारी परतले असल्याची माहीतीही यावेळी धर्मगुरु जॉन गुलदेवकर यांनी दिली.


या दहा दिवसांच्या दौऱ्यात निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये भर उन्हाळ्यात थंडगारवा मिळत असल्यामुळे या पर्यटकांनी मोठा आनंद लुटलेला आहे आम्हाला रेल्वे आणि विमान प्रवास घडवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटण्यासाठी धर्मगुरु गुलदेवकर यांनी सुखरुप नेऊन पुन्हा माघारी आणून सोडल्यामुळे नेवाशातील भाविक – भक्त धर्मगुरु गुलदेवकर यांचे आभार मानून चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून आलेला होता.

लाल किल्ला
लाल किल्ला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लाल किल्ला
लाल किल्ला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लाल किल्ला
error: Content is protected !!