ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दूध

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव हे ८ ते १० हजार लोकसंख्येचे गाव असून या गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे, त्यामध्ये ८० टक्के शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात, परंतु गेल्या काही दिवसापासून दुधाला अतिशय कमी भाव मिळत असल्याने हा धंदा करणे शेतक-यांना परवडत नाही. सध्या प्रति लिटर २७ ते २८ रु.दुधाला दर मिळत आहे, त्यामध्ये जनावरांना चारा, खाद्य, या सर्व गोष्टी करणे शक्य होत नाही, सद्य परीस्थितीमध्ये शेतक-यांच्या हातामध्ये दुधाचा एकही रुपया पडत नाही, त्यामुळे या दूध धंद्याकडे अनेक शेतकरी पाट फिरवताना दिसून येते.

तसेच शेतीमालाला हि भाव नसल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे, जर दुधाला ३५ ते ४० रुपये दर मिळाला तर सर्व शेतक-यांचा उदरनिर्वाह अतिशय चांगल्या प्रकारे होईल, तरी नेवासा येथील नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना पाचेगाव येथील सरपंच वामनराव तुवर,अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे,उपसरपंच ज्ञानदेव आढाव,गहिनीनाथ सोसायटीचे मा उपाध्यक्ष जालिंदर विधाटे व इतरांनी निवेदन देते वेळी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की,आपणास विनंती करण्यात येते की आपण लवकरात लवकर आमची मागणी शासनस्तरावर कळवून दुध दर वाढवावी.

जर पुढील ८ दिवसामध्ये दुधाच्या दरामध्ये वाढ झाली नाही तर बेलपिंपळगाव फाटा येथे पाचेगाव परिसरातील गावांच्या वतीने भव्य अश्या प्रकारचे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी निवेदनातद्वारे दिला. यामध्ये सर्व दूध उत्पादक महिला, लहान मुले, जनावरे आदींचा समावेश करण्यात येईल अशी माहिती यावेळी दिली. याबाबत मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मा. दुग्धविकास मंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, मा. पोलीस निरीक्षक साहेब, नेवासा पोलीस स्टेशन यांना देखील निवेदन सादर केली आहे.

दूध
दूध
दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध