ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गोगलगाव

नेवासा – तालुक्यामध्ये एन मे महिन्याच्या पार्श्वभूमी वरती गंथडी पत्त्यामध्येही पाण्याची मोठी टंचाई पाहायला मिळत आहे गंथडी पट्ट्यामधील नदीचे पाणी मृतसाठ्यामध्ये आले आहे त्याच अनुषंगाने नदीकाठावर असलेले गोगलगाव या गावाला दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. तसेच नेवासा तालुक्यामध्ये नदीकाठच्या गावाची अशी परिस्थिती आहे तर इतर गावाची काय परिस्थिती असणार हा प्रश्न मोठा भेडसावत आहे.

धर्माचे पालन हेची आम्हा करणे काम!! या श्री तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे श्री क्षेत्र गोगलगाव या
नावाला शोभेल असं अध्यात्मिक कार्य गावातील शेतकरी संघटना शाखाध्यक्ष श्रीविश्वास मते यांनी केले..

नेवासा तालुक्यातील गोगलगाव ता. नेवासा जिल्हा-अहिल्यानगर येथील गावामधे गेल्या एक महिन्यापासून गावात पाणी टंचाई भेडसावत आहे व दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत गोगलगाव येथील येथील वृद्ध ,महिला, लहान बालके पाण्यासाठी महिला पायपीट करताना पाहिल्याने मनामध्ये कुठेतरी सामाजिक प्रश्नाची जाण विश्वास मते यांना जाणवली व त्यांनी महिलांचा पाण्यासाठीचा किलोमीटर चा प्रवास आज सुखकर केला.

गोगलगाव मध्ये पाण्याची समस्या बघुन गावांमधील शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष श्री विश्वास मते यांनी गावातील भीषण पाणीटंचाई बघता गावातील झोपडपट्टी, दलित वस्ती परिसरात आपले विहिरीचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी हे पाणी आपल्या स्वखर्चाने पाईप लाईन करून दलितांच्या दारापर्यंत पोचण्याचे पुण्याचे काम केले आहे. गोगलगाव येथील संपूर्ण झोपडपट्टी परिसराला पाण्याची सोय झाल्यामुळे विश्वास मते यांचे गोगलगाव ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशी मध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.

गोगलगाव

विश्वास मते यांची एक वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक व्यक्तिमत्व आणि समाज सेवेची भूक असणारे व्यक्तिमत्व म्हणून गोगलगाव परिसरामध्ये ओळख आहे. या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या समवेत बाळासाहेब बेहळे, राजेंद्र एकनाथ मते, सुनील बेहळे, निलेश पाटील साहेब, विजय पवार, पोपट बेहळे आदी ग्रामस्थ सहभागी आहेत या सामाजिक उपक्रमामुळे त्यांचे तालुका भर कौतुक केले जात आहे. विश्वास मते सारख्या अशा सामाजिक कार्य सर्वांनीच पाण्यासंदर्भात हाती घेण्याचे काळाची गरज आहे.

गोगलगाव
गोगलगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोगलगाव
गोगलगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोगलगाव
error: Content is protected !!