ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खंडोबा

क्लास न लावता यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव उपक्रम समाजासाठी आदर्शवत – संभाजी पवार

नेवासा – नेवासा बुद्रुक येथील म्हाळसा खंडोबा बाणाई पुरातन देवस्थानच्या वतीने क्लास न लावता जिद्द व चिकाटीने यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.क्लास न लावता यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव उपक्रम समाजासाठी आदर्शवत व प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन उद्योजक संभाजी पवार यांनी यावेळी बोलताना केले.
     परिस्थिती फारशी प्रतिकूल नसेलही,पण अनुकूल ही नक्कीच नव्हती,ग्रामीण भागातील मुले क्लासेस ची कोणतीही व्यवस्था नाही.. पुढील मार्गदर्शनाच्या कोणतीही सोय नाही..तरीही फक्त कष्ट आणि जिद्द यावर.. दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या मुला मुलींचा सत्कार आज म्हाळसा खंडोबा बाणाई पुरातन मंदिर जीर्णोध्दार समिती तर्फे  केला जात असल्याचे मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

खंडोबा

या प्रसंगी श्री उंडे सर यांनी मुलांना व पालकांना दोघांनाही या दहावी बारावीनंतर काय करता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि जीर्णोद्धार समितीतर्फे एक छोटीशी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजीराव पवार,नेवासा बुद्रुक चे सरपंच  प्रकाश सोनटक्के, श्री उंडे सर,अनिल बोरकर, निलेश जोशी,राजाभाऊ थावरे, विजय कोकणे,बालू फसले,पत्रकार शाम मापारी,माऊली गायकवाड,संजय मारकळी,प्रसाद रहाट उपस्थित होते सदर सत्कार सोहळ्यास नेवासा बुद्रुक मधील अनेक ग्रामस्थांनी हजेरी लावली..

अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा गावात प्रथमच होतोय अशा प्रतिक्रिया सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या.जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे यांनी याप्रसंगी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिर्णोद्धार समिती दरवर्षी करेल असा शब्द दिला..
सदर कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार  निलेश जोशी यांनी मानले.

खंडोबा
खंडोबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खंडोबा
खंडोबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खंडोबा
error: Content is protected !!