ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सरपंच

सौंदाळा – नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात पिण्याच्या पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली असताना शासनाकडे प्रस्ताव देण्यात वेळ न घालवता स्वतः च्या विहिरीतून पाईपलाईन मधुन ग्रामपंचायत विहिरीत पाणी टाकून ग्रामपंचायत पाणी पुरवठा पाईप लाईन द्वारे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी करून दिली आहे
पाऊस कमी प्रमाणात झाल्याने नेवासा तालुक्यातील अनेक गावात सध्या उन्हाळ्यामुळे मोठया प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे.

सरपंच

सौंदाळा गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे हाल बघून लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी स्वतः च्या शेतातील पिकांना महत्व न देता ग्रामस्थांच्या सेवेला महत्व दिल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना धन्यवाद दिले. ग्रामपंचायतच्या वतीने ५ रु मध्ये २० लिटर थंड व शुद्ध पाणी आर ओ प्लांट द्वारे दिले जाते त्याचा मोठया प्रमाणात लाभ ग्रामस्थ घेत आहेत त्यामुळे उष्ण वातावरणात थंड पाणी मिळते आणि आरोग्य देखील उत्तम राहते. मे महिन्यात टँकरची गरज सौंदाळा गावासाठी भासणार आहे. तसेच गावातील जलजीवन मिशन योजनेच्या विहिरीचे काम तातडीने करणार असल्याचे यावेळी सरपंच आरगडे यांनी सांगितले.

सरपंच
सरपंच

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सरपंच
सरपंच

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सरपंच
error: Content is protected !!