ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराष्ट्र दिन

होणाऱ्या आजाराला रोखण्यासाठी व रुग्णांना व्याधीमुक्त करण्यासाठीच महाआरोग्य शिबिराचे आयोजन – डॉ. घुले

नेवासा – महाराष्ट्र दिनी नेवासा येथे समर्पण फाउंडेशनच्या सौजन्याने तसेच नेवासा तालुका मेडिकल असोसिएशन व एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिराला  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकूण रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.होणाऱ्या आजाराला रोखण्यासाठी व रुग्णांना व्याधीमुक्त करण्यासाठीच महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिबीराचे आयोजक डॉ.करणसिंह घुले
यांनी यावेळी बोलताना सांगितले.

        नेवासा येथील बाजारतळ प्रांगणात झालेल्या शिबिराच्या उदघाटन जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आर बी गायकवाड हे होते तर माजी शिक्षक एस.आर.शिंदे, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष बापूराव बहिरट,डॉ.भाऊसाहेब घुले,डॉ.राजेंद्र शिर्के,डॉ.लक्ष्मणराव खंडाळे,डॉ.अशोक झरेकर,डॉ.नितीन करवंदे,डॉ. मोहसीन बागवान,डॉ.शंकर शिंदे,अँड. जानकीराम डौले,नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, डॉ.शिवतेज दारुंटे,डॉ.रविंद्र दरंदले,डॉ. विजय गाडे, डॉ.शिवाजीराव गोरे,अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथीक कॉलेजचे प्राचार्य पंकज दुक्कड, डॉ.प्रमोद देवखिळे,डॉ.नजन,होमिओपॅथीक असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.गणेश बर्डे, डेंटिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.श्रवण एरंडे,डॉ. राजेंद्र म्हस्के,प्रशांत शिर्के,डॉ. बाळासाहेब आरेकर,डॉ.अर्जुन शिंदे,डॉ.प्रणव जोशी,लॅब असोसिएशनचे अध्यक्ष संजय कर्जुले,डॉ.मनोज फिरोदिया आरोग्य मित्र निवृत्ती जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.

   यावेळी आरोग्य महा शिबिराचे आयोजक व समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी आलेल्या मान्यवर व तज्ञ डॉक्टर मंडळींचे स्वागत केले यावेळी बोलताना ते म्हणाले की माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासेनगरीत महाआरोग्य शिबीराची संकल्पना आज नेवासा मेडिकल असोसिएशन व एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव यांच्या योगदानातून साकार होत आहे,रुग्णांना होणारे आजार वाढू नये यासाठी या शिबिराचे आयोजन सर्वांचे सहकार्याने करण्यात आले असल्याचे सांगून त्यांनी महागडे उपचार व शस्त्र क्रिया मोफत कशा करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असून नेवासाफाटा येथे जागा उपलब्ध करून ही महागडी ऑपरेशन तेथेच करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

   यावेळी उपस्थित मान्यवरांसह डॉक्टर मंडळींचा सन्मान समर्पण फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला.या प्रसंगी अँड. जानकीराम डौले,डॉ.लक्ष्मणराव खंडाळे,डॉ.सुभाष भागवत यांनी मनोगत व्यक्त करत महाआरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्पण फाऊंडेशनचे प्रवक्ते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवानिवृत्त औषध निर्माता डॉ.संजय सुकाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

   यावेळी झालेल्या महा आरोग्य शिबीर प्रसंगी समन्वयक अमोल पिंगळे,डॉ.बाळासाहेब कोलते,ज्ञानेश्वर पेचे,मनोज पारखे,महेश मापारी,डॉ.अभिजित त्रिभूवन,जगन्नाथ जपे,राजेंद्र मापारी,संदीप बेहळे,डॉ.जालिंदर गोरे,किशोर सुकाळकर,सचिन नागपुरे,संदीप आलवणे,विनायक लोळगे,सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई आलवणे यांच्यासह विविध व्याधीग्रत लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन

    यावेळी झालेल्या महा आरोग्य शिबीर प्रसंगी कान नाक घसा कक्ष,हदयरोग कक्ष,बालरोग कक्ष,स्त्री रोग निदान कक्ष,अस्थिरोग निदान कक्ष,मधुमेह रुग्ण कक्ष यांची स्वतंत्र तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली होती या शिबिरामध्ये
एकुण नोंदणी: 1346 निदान निश्चिती करता आवश्यक तपासणी कामी एकुण रुग्ण- 346

निश्चित निदान झालेले रुग्ण:81
पैकी आजार वर्गिकरण खालील प्रमाणे

ह्रदय रोग:-07
बायपास:- 02
कान नाक घसा शस्त्रक्रिया:-12
बाल ह्रदय रोग शस्त्रक्रिया:-2 (ASD:1/VSD2)
मोतिबिंदू शस्त्रक्रिया: – 22
जनरल शस्त्रक्रिया: -05
गुडघा बदली व खुबा बदली शस्त्रक्रिया करता: -31 हे रुग्ण पूर्णतः मोफत शस्त्रक्रियेसाठी निवडले गेले आहे.
नेवासा तालुका मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर मंडळीसह अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या तपासणीसाठी येथे सहभाग नोंदवला.

newasa news online
महाराष्ट्र दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराष्ट्र दिन
Share the Post:
error: Content is protected !!