ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शनी

शनि शिंगणापूरात शनिरत्न पुरस्कार सोहळा संपन्न.

सोनई – शनिशिंगणापूर ता नेवासा येथे श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शनिशिंगणापूर च्या वतीने देवस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्व बाबुराव बानकर(भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरातील मान्यवरांना शनिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो यावर्षी शुक्र दि 7 जुन 2024 रोजी श्री श्री 1008 परमहंस कृष्णानंद कालिदास महाराज हरियाणा यांना शनिरत्न पुरस्कार श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व समाधान महाराज शर्मा, महंत सुनीलगिरीजी महाराज ,माजी आ पांडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला याप्रसंगी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन झाले.

आ शंकरराव गडाख याप्रसंगी बोलतांना म्हणाले स्व बाबुराव बानकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देवस्थान विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देते हे कौतुकास्पद आहे. यावर्षीचा पुरस्कार अध्यत्मिक क्षेत्रात समर्पण भावनेने काम करणाऱ्या कालिदास महाराज यांना देण्यात आला आहे याचा मनाला विशेष आनंद आहे. श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने अनेक पथदर्शी प्रकल्प राबविल्याने व शनी महाराजांची असलेली महती यामुळे जगभरातील अनेक भाविक दर्शनासाठी येतात. नेवासा ही संताची व आध्यात्मिक परंपरा जपणारी भूमी असल्याचे आ शंकरराव गडाख म्हणाले. पुरस्काराला उत्तर देतांना कृष्णानंद कालिदास महाराज म्हणाले शनी भगवंताच्या दर्शनाने जीवनतील व्याधी दूर होतात न्याय देवता असलेल्या शनी भगवंताच्या भूमीतून मिळालेला पुरस्कार उर्जादायी असल्याचे कालिदास महाराज म्हणाले.

शनी

शनिशिंगणापूर परिसरात पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प देशातील नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे रोल मॉडेल असल्याचे त्यांनी सांगितले. आ शंकरराव गडाख हे साधू संत,महंत यांचा सन्मान करणारे नेतृत्व आहे व शंकरराव गडाख हे सर्वसामान्य जनतेशी नाळ असणारे व जमिनीवर राहून काम करणारे नेते आहेत असे ते म्हणाले पुरस्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील संत महंत यांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले याचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी महंत भास्करगिरीजी महाराज ,सुनीलगिरीजी महाराज, माजी आ पांडुरंग अभंग यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रस्ताविक चिटणीस प्रा आप्पासाहेब शेटे यांनी केले.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर,आदीसह आप्पासाहेब शेटे,दीपक दरंदले,पोपट शेटे,पोपट कु-हाट ,डॉ शिवाजी दरंदले, शहाराम दरंदले,छबुराव भुतकर, सौ सुनीता आढाव , उद्योजक ,सोनी ,जयेश शहा, मुकेश तेजवणी आदीसह व तालुक्यातील ग्रामस्थ ,शनी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना याप्रसंगी देवस्थानच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.

आत्तापर्यत देवस्थानच्या वतीने 19 विवीध क्षेत्रातील मातब्बराना शनिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
यामध्ये सदानंद मोरे,मा खा यशवंतराव गडाख, रामराव महाराज ढोक,व्यंकटेश राव,महंत उद्धव महाराज मंडलिक यांचा समावेश आहे.

शनी
शनी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनी
शनी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनी
error: Content is protected !!