ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गोवंश

गणेशवाडी – नेवासे तालुक्यातल्या चांदा या गावात असलेल्या तीन कत्तलखान्यांतून दररोज हजारो किलो गोमांस आणि अनेक गोवंश (गावरान गायीची वासरं) छत्रपती संभाजीनगरसह गंगापूरकडे रवाना केली जाताहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकडून हाताची घडी तोंडावर बोट असला प्रकार चालू आहे ही वासरे ओरडू नये म्हणून वासरांच्या तोंडाला चिकटटेप लावून हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस काय करताहेत? आणि ‘जय श्रीराम’चा नारा लावणारं सरकार गोहत्या का थांबवत नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे सोनई पोलिसांची गाडी घोडेगाव येथूनच सायरन वाजवत आली आणि हात हलवत गेले…!चांदा हे गाव सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं.

काही गोरक्षकांनी शनिवारी (दि. ८) या दिवशी सोनई पोलिसांना फोन करुन खबर दिली, की एका टेम्पोत ३५ जनावरं आहेत. त्यामध्ये गोवंश (गायींची वासरं) मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानुसार घोडेगाव चौफुल्यावरुनच पोलीस गाडी सायरन वाजवत चांद्यात आली. मात्र गाडीच्या खाली उतरण्याची जराशीही तसदी न घेता पोलीस हात हलवत परत गेले. मात्र तिथून जवळच जनावरांची तस्करी सुरु होती, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.खबर देणाऱ्याचंच नाव होतं ‘लिक’…!अवैध धंदे आणि कत्तलखान्याची पोलिसांना खबर देणाऱ्याचं नाव जाहीर न करण्याचा पोलीस खात्यात रिवाज आहे.

पण हा धंदा करणारे इसम आणि काही स्थानिक पोलिसांचं इतकं अतूट नातं तयार झालं आहे, की खबर देणाऱ्याचंच नाव सर्वात आधी संबंधितांना दिलं जातं. त्यामुळे या पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.…!स्थानिक पोलीस या कत्तलखान्यावर कारवाई का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत आहे. कत्तलखाने चालविणारे आणि स्थानिक पोलिसांची मिलीभगत आसल्याने यावर कारवाई होत नाही. यातूनचिरीमिरी’ घेणाऱ्याला नरकात जागा मिळत नाही…!हिंदू धर्मात गायीला अनन्य साधारण महत्व आहे गाईला गोमाता म्हटलं जात असलं तरी या गोमातेचं गोमांस विकून ‘रग्गड’ पैसा कमविणारे या जिल्ह्यात भरपूर लोक आहेत. मात्र ज्या पोलिसांच्या आशिर्वादानं हा गोरखधंदा सुरु आहे, ते सारेच नाही.

मात्र काही पोलीस हा धंदा करणाऱ्यांकडून ‘चिरीमिरी’ घेत असल्याची चांद्यात जोरदार जोरदार चर्चा आहे. गाय कापणाऱ्या लोकांकडून ‘चिरीमिरी’ घेणाऱ्याला नरकात जागा मिळणार नाही, असं म्हणतातवं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गोवंश
गोवंश
गोवंश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोवंश
गोवंश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोवंश
error: Content is protected !!