ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

किड्स किंग्डम अकॅडमी

गणेशवाडी – किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने शाळेत डॉ. योगेश वाघ सर, डॉ. प्रवीण तांबे सर,डॉ.पार्थ मरकड सर, डॉ. तुषार दराडे सर, डॉ.कोमल मोकाटे मॅडम, डॉ. गायत्री बडाख मॅडम,डॉ. सायली लिपाने मॅडम व डॉ. स्वाती अट्टल मॅडम हे उपस्थित होते.डॉ. तुषार दराडे सर व डॉ. गायत्री बडाख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर्स डे निमित्ताने डॉक्टर्सचे महत्त्व समजावून दिले. तसेच विद्यालयात त्या निमित्ताने डॉ. तुषार दराडे, डॉ. पार्थ मरकड, डॉ. सायली लिपाने, डॉ.स्वाती अट्टल यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.

किड्स किंग्डम अकॅडमी

तसेच डॉ. गायत्री बडाख यांनी किशोरवयीन मुलींना त्यांच्या सर्वांगीण विकास व मासिक पाळीबद्दल प्रशिक्षण दिले. तसेच त्यांच्या दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा म्हणून सर्व डॉक्टर्स साठी संगीत खुर्ची हा खेळ ठेवण्यात आला होता सर्वांनी त्यात सहभाग घेऊन त्याचा आनंद घेतला. संगीत खुर्ची मध्ये डॉ. तुषार दराडे सर प्रथम, डॉ. सायली लिपाने द्वितीय व डॉ. गायत्री बडाख तृतीय असे क्रमांक मिळवून खेळात विजयी ठरले. सदरच कार्यक्रम शाळेचे सचिव सचिन बंग सर व मुख्याध्यापिका कीर्ती बंग यांच्या उपस्थित झाला तसेच उपमुख्यध्यापक फटाले सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

किड्स किंग्डम अकॅडमी
किड्स किंग्डम अकॅडमी
किड्स किंग्डम अकॅडमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किड्स किंग्डम अकॅडमी
किड्स किंग्डम अकॅडमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किड्स किंग्डम अकॅडमी
error: Content is protected !!