ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – चाकूचा वार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी नेवासा तालुक्यातील अमोल गाडेकर यांनी धाव घेतली आहे याबाबत गाडेकर यांनी  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की  गोधेगांव ता. नेवासा येथील  मालकीची गट नंबर 206 हा असून सध्या सदर गट नंबरमध्ये कपाशी पिक लागवडी साठी सरी पाडलेली आहे. सदर गट नंबर 206 बाबत नेवासा येथोल मे. सिव्हिल जज्ज साहेब सि.डी. यांचे कोर्टात स्पे.मु.नं. 25/2024 चा दावा दाखल आहे. व सदरचा दावा आज रोजीम कोर्टात प्रलंबित आहे.

लिलाबाई पंढरीनाथ पिंपळे हिच्या विरुध्द दावा दाखल केलेला आहे असे असतांनी श्री आप्पासाहेब पंढरीनाथ पिंपळे व त्यांचा पुतण्या केशव विष्णु पिपळे हे दोघे काल दिनांक 30/05/2024 रोजी गट नंबर 206 मध्ये सायकांळी 6.30 वाजेच्या सुमारास आले असता आप्पासाहेब पंढरीनाथ पिंपळे हा म्हणाला की, मला सुट्टी असल्याने मी आता गावी आलेलो आहे. तुम्ही माझ्या आईच्या विरुध्द असलेला दावा काढून घ्या नाहीतर मी तुमचे काहीतरी बरेवाईट करेल असे म्हणून जोरजोरात शिवीगाळ करू लागला त्यावेळेस त्यास समजुन सांगितले की, आपला गट नंबर 206 नेवासा येथीला सिव्हील  कोर्टात दावा चालू आहे व सदरच्या दाव्याचा अद्यापपावेतोः निकाल झालेला नाही.

त्यामुळे तुम्ही आम्हाला सदरची दावा मिळकत करण्यास हरकत अडथळे करू नका असे सांगत असतांनी आप्पासाहेब पंढरीनाथ पिपळे याने त्याचे खिशातुन सोबत आणलेला धारदार चाकु काढून अमोलच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस  त्याचा वार चुकविण्याकरीता अमोलने डावा हात पुढे केला असता त्याच्या डाव्या हाताचे मधले बोट हे कापले गेले. त्यावेळेस त्याने मोठ मोठ्याने आरडाओरड केली असता आप्पासाहेब पंढरीनाथ पिंपळे व  पुतण्या केशव विष्णु पिंपळे याने  खाली पाडुन लाथाबुक्याने मारहाण केली व   तुझा आम्ही काटा काढु असे म्हणत होते.

अमोल याचा आरडाओरडा ऐकून जवळच रस्त्याने जाणारे दिलीप दत्तात्रय शेलार व संजय परसराम पल्हारे हे तेथे पळत आले त्यावेळी लोक आल्याचे पाहुन वरील दोन्ही इसम हे त्या ठिकाणाहुन निघुन गेले व जाताना  आज तु वाचलास पुन्हा जर आमच्या नादाला लागले तर तुझा व तुझ्या कुटुंबियांचा कायमचा काटा काढुन टाकु असा दम देत तेथून पळुन गेले.

सदर इसम हे आडदांड व नंगट प्रवृत्तीचे असुन ते कधी काय करतील भरवसा राहिलेला नाही, तसेच सदरील इसमांचा गावात मोठा जोड जमाव आहे. आप्पासाहेब पंढरीनाथ पिंपळे हा सैन्यदलात नोकरीस असुन तो सैन्यदलातुन सुट्टीसाठी गांवी आलेला आहे. त्यामुळे तो केव्हा काय करेल याची भिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सदर व्यक्तीबद्दल योग्य ती कायदेशीर करुन झालेल्या मारहाणीबद्दल व जिवे ठार मारण्याची धमकी दिलेबद्दल गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी  अर्जात करण्यात आली आहे.

चाकू
newasa news online
चाकू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चाकू
चाकू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चाकू
error: Content is protected !!