ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

प्रकाशानंदगिरीजी महाराज

भगवंताला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष पध्दतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा-स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज

नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी दि.३ मे रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.भगवंताला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष पध्दतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

शुक्रवारी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी दत्त अवतारी श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबा व शांतीब्रम्ह गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी समाजाच्या उद्धारासाठी केलेली तपश्चर्या, त्याग,समर्पित जीवन कार्य यावेळी बोलताना विषद केले.झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी स्वामींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन केले.

प्रकाशानंदगिरीजी महाराज

संत तुकोबारायांच्या घेतलेल्या अभंगातून त्यांनी भगवंतांची भक्तांवर असलेली भक्त वत्सलता कशी असते हे किर्तनातून बोलतांना स्पष्ट केले. देव भक्तांचा भाव पहात असतो त्याला दुसरे काहीही लागत नाही,देवाजवळ जायचे असेल तर जीवनात संत संगतीत राहून परमार्थ करा, देवाला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष भक्ती करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणाऱ्यांचा सन्मान श्रीफळ प्रसाद व उपरणे देऊन करण्यात आला यावेळी माजी सरपंच गजानन चव्हाण,ईश्वर बाकलीवाल,शंकर जाधव,प्रकाश निकम, राजेंद्र चव्हाण यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी अशोक महाराज पांडव, राजेंद्र महाराज आसने,अशोक महाराज निरपळ,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल,संदीप सुडके,पांडुरंग काळे,दिनकर कदम,सुभाष दिघे,गजानन चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबासाहेब शिंदे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आठ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहात बीड येथील हभप वर्षाताई काळे,अमोल महाराज बडाख, संतोष महाराज चौधरी, कारभारी महाराज झरेकर, जगदीश महाराज जोशी,जगन्नाथ महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम झाले.तर दुपारी ३ ते ५ यावेळेत रामायणाचार्य हभप अशोक महाराज निरपळ यांच्या सुश्राव्य वाणीतून झालेल्या संगीत रामायण कथेला ही ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रकाशानंदगिरीजी महाराज
प्रकाशानंदगिरीजी महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रकाशानंदगिरीजी महाराज
प्रकाशानंदगिरीजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रकाशानंदगिरीजी महाराज
error: Content is protected !!