ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Horoscope Today

Horoscope Today : सोमवार १५ एप्रिल २०२४

Horoscope Today 15 April 2024 : पंचांगानुसार, आज 15 एप्रिल 2024, आठवड्यातला पहिला दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष रास (Aries Horoscope Today)

कष्टाचे डोंगर उपसावे लागतील परंतु त्यातूनही प्रेरणा मिळेल. तुमच्या हुशारीचा नोकरी धंद्यात उपयोग होईल.

वृषभ रास  (Taurus Horoscope Today)

आज धार्मिक गोष्टींशी जास्त संबंध येईल. व्यवहारी गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन जरा जास्तच ध्येयवादी बनाल. तुमच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करून दाखवाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आजूबाजूच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रवास घडतील. महिलांना आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

अनेक गोष्टी कर्तव्य म्हणून करावे लागतील. त्यामुळे कामाविषयी थोडी अप्रियता निर्माण होऊ शकते. तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश लाभेल. 

सिंह रास  (Leo Horoscope Today)

नोकरी व्यवसायामध्ये खूपच धाडस दाखवाल. त्याचे चांगले वाईट परिणामही भोगावे लागतील. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आपले ते खरे करून चालल्यामुळे कुटुंबीयांशी थोडे मतभेद संभवतात. आपली मते दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्नही कराल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

आग्रही वृत्तीमुळे सर्व क्षेत्रांमध्ये थोडी खळबळ माजवून टाकाल. यामुळे मानसिक शांतता स्वास्थ्य भंग पावण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वैवाहिक सौख्यामध्ये मनासारखे दान पडेल. मोठ्या माणसांच्या तब्येतीला जपावें लागेल. महिलांनी वादविवाद न करता सामंजस्याचे धोरण ठेवणे फायद्याचे ठरेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आज काही निर्णय व्यवहाराच्या कठीण पाषाणावर उभे राहून घ्यावे लागतील. तुमच्या बौद्धिकतेची साथ सर्वांना उत्तम मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

पुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला धडाडीने सामोरे जाल. येथे मनाचा समतोल उत्तम राखून बरोबरच्या मित्र-मैत्रिणींचे उत्तम सहकार्य लाभेल. 

कुंभ रास  (Aquarius Horoscope Today)

नोकरी व्यवसायात खोलवर विचार करून चिकाटीने कामे पूर्ण कराल. कंटाळा हा शब्द तुमच्या कोशात नसेल. 

मीन रास  (Pisces Horoscope Today)

आर्थिक स्थिती उत्तम राहिली तरी जवळच्या पैशाला खर्चाच्या अनेक वाटा फुटतील. त्यामुळे तो लवकर गुंतून टाकलेला चांगला.

Horoscope
Horoscope

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Horoscope
Horoscope

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Horoscope
error: Content is protected !!