ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चोर

गणेशवाडी – क्रुषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथुन चोरी गेलेल्या कांद्यासह दोन सराईत आरोपी सोनई पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार भाऊसाहेब दामोदर दातार रा. घोडेगाव यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन दि. २९ मे रोजी रात्री १२ वाजेच्या नंतर कुणीतरी अज्ञात चोरट्यानी पत्र्याचे कंपाऊंड तोडून सुमारे ५०,००० रुपये किंमतीच्या कांद्याने भरलेल्या गोण्या चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. २४४/२०२४ भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

सोनई पोलीसांनी तपासाच्या कामी वेगाने चक्र फिरवत सदरचा गुन्हा हा. आरोपी धनंजय आल्हाट रा. झापवाडी घोडेगाव रोड, समिर उर्फ काल्या सलिम सय्यद रा. घोडेगाव यांनी केलेला असल्याचे समजल्याने त्यांना पकडून त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली व चोरी गेलेला १८००० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरच्या गुन्ह्याचा तपास पो. हे. काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे साहेब श्रीरामपूर , पोलीस उप विभागीय अधिक सुनील पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पो. स. ई मेढे , पो. हे. काॅ. दत्ता गावडे, पो. हे. काॅ. आडकित्ते, पो. ना. सोमनाथ झांबरे , पै. काॅ. महेंद पवार, पो. काॅ. रवींद्र गर्जे, पो. काॅ. रामदास तमनर यांनी केली आहे.

चोर
चोर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोर
चोर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोर
error: Content is protected !!