ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कृषी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने खरिप पुर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. दि. ०७ जुन रोजी खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या मध्ये शेतकऱ्यांना जमीन मशागती पासून ते पिक काढणे पर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. या कृषीचर्चा व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय सोनई येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रा. श्रीकृष्ण हुरुळे सर यांनी शेतकरी बंधूंना खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, बाजरी अशा विविध पिकांवरील एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान, माती परीक्षण, हुमनी कीड व्यवस्थापन तसेच जैविक खतांचा शेतीमध्ये वापर या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी सहाय्यक श्रीमती व्ही. एम. काळे मॅडम यांनी सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेतले. कृषि पर्यवेक्षक श्री. बी.डी. कराड साहेब यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पत्रकार गणेश बेल्हेकर, दिपक क्षिरसागर व गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती काळे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदरील कार्यक्रम मंडळ कृषि अधिकारी सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कृषी
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी
error: Content is protected !!