ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अल्पवयीन

अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. मागील काही दिवसांचा विचार केला तर अनेक घटना समोर आलेल्या आहेत.पोलिसांनी यातील अनेकांचा शोधही घेतला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातून पुन्हा दोन अल्पवयीन मुलींना व एका मुलास पळवण्याची घटना घडली आहे. यातील एकीला तर जावयानेच पळवले असल्याचे समोर आले आहे. यातील पहिल्या घटनेत कोले तालुक्यातील बारीगाव येथे लग्नातून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेले.

दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचे समोर आले. तर तिसऱ्या घटनेत राहुरी तालुक्यातील संक्रापूर परिसरामधून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रविंद्र नावाच्या मावस जावयाने पळवून नेले आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली असून रविंद्र याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. मुलींना पळवण्याचे प्रकार हे चिंताजनक असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

अकोले तालुक्यातील बारीगाव येथील नातेवाईकांच्या लग्नामध्ये आलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नामधूनच पळवले. याप्रकरणी मुलीच्या आईने राजूर पोलिसात फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील मालुंजा येथील असलेला १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा पुण्यात शिक्षण घेत असताना तो नातेवाईकांमधील एका मुलीच्या लग्नाला मालुंज्यात आलेला होता. या लग्नामधून कुणीतरी त्याला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून मुलाच्या वडीलांनी श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

अशा घटनांमुळे सध्या पालकवर्गांत चिंतेचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलींना पळवण्याचे अनेक प्रकार घडत असल्याने एक भीतीही आहे. यामध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रबोधन करावे, जाग्रुती करावी असे आवाहन केले जात आहे. तसेच कॉलेज किंवा इतर ठिकाणी जाताना शक्य असल्यास पालकांनीही सोबत राहावे असा एक सूर सध्या समोर येत आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलीस प्रशासन सजग झाले आहे. अनेक मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून शाळेंमध्ये प्रबोधन वर्गही भरवण्यात येत आहेत.

अल्पवयीन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अल्पवयीन
अल्पवयीन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अल्पवयीन
error: Content is protected !!