ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची(Accident) घटना घडली आहे, या अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समृद्धी महामार्गावरील जालना जिल्ह्यातील कडवंची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे.

नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

स्विफ्ट कारणे धडक दिल्यानंतर ईरटीका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर येत आहे.

रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. MH.12.MF.1856 मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कार क्रं. MH.47.BP .5478 ला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गावर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील अनेक भीषण अपघात या महामार्गावर झाले आहेत.

Accident
Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident
error: Content is protected !!