ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कार्यक्रम

नेवासा – तालुक्यातील पिंपरीशहाली शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा…जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरीशहाली शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड साहेब, अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे, विकास मंडळाचे सचिव संतोष मगर, केंद्रप्रमुख नामदेव दहातोंडे, नामदेव शिरसाट यांच्या हस्ते कार्यक्रमाचे जल्लोषात उद्घाटन झाले. स्वागत गीताने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष भोपे सर यांनी केले.उपस्थित पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कराड साहेबांनी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता असते म्हणून काळाचे पाऊल ओळखून विद्यार्थी घडवण्याचं उत्कृष्ट काम जिल्हा परिषद शाळेतच केले जाते असे सांगून सुंदर शैक्षणिक वातावरण व उत्कृष्ट नियोजनासाठी त्यांनी शाळेचे भरभरून कौतुक केले. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे यांनी जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्याशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही विदयार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व त्यांच्या गुणांना प्रेरणा देण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असते असे प्रतिपादन केले. राम आयेंगे या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली एका चढ एक असे भरगच्च कार्यक्रम सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते अतिशय दर्जेदार कार्यक्रम बघून ग्रामस्थ आणि उपस्थित परिसरातील पालक अत्यंत रममान झाले होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा अतिशय दर्जेदार कार्यक्रम बघून मराठी शाळेमध्ये मुलांचा शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक भावनिक विकास केला जातो याचे प्रत्यक्ष दर्शन बघून डोळ्यांची पारणे फिटली अशा पालकांच्या प्रतिक्रिया कार्यक्रमात दिसून आल्या.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मसमभाव, स्वच्छता अभियान शिक्षणाचे महत्त्व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची होत असलेली वाताहत सामाजिक समस्यांना स्पर्श करण्यात यात लोकगीत, लावणी, लेझीम, टिपरीनृत्य, भारुड, गोंधळगीत, मूकनाटय विनोदी गीत, देशभक्तीपर गीतांचा सामावेश होता.अशा भव्य दिव्य कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये वारंवार झाले पाहिजे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.तब्बल चार तासांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम अशा पालकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया कार्यक्रमात दिसून आल्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक संतोष भोपे, रामनाथ खरड, नवनाथ काळे, नवनाथ फुलारी, विठ्ठल काळे, रवींद्र चंदन, सतीश धनवडे, दादासाहेब काळे , सुवर्णा कदम, आरती वाकचौरे, मोहिनी चंदन यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ खरड, विठ्ठल काळे, सतीश धनवडे यांनी केले तर रवींद्र चंदन यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रम
कार्यक्रम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कार्यक्रम
कार्यक्रम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कार्यक्रम
error: Content is protected !!