ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वीज

नेवासा – तालुक्यातील प्रवरासंगम येथील हॉटेल दीपक येथे छापा मारून तब्बल ७,१७,४५०/- रुपयांची वीज चोरी महावितरणच्या ठाणे येथील भरारी पथकातील अ.का.अभियंता हरेश भावर, नेवासे उ.का.अभियंता राहुल बडवे, स.अभियंता प्रवरासंगम अमोल मालुंजकर व कर्मचारी यांनी पकडली‌.
हॉटेल दिपकचा मालक दिपक दिलीप अगले(वय ४५ वर्ष) हा मागील १७ महिन्यापासून ३३०२८ युनिटची चोरी करून तब्बल ७,१७,४५०/- रुपयांची वीज चोरी करून महाराष्ट्र शासनाच्या म.रा.वि.वि.कं.लि. चे आर्थिक नुकसान केले आहे.तसेच सदर ग्राहकाने यापूर्वी सुद्धा दोन वर्षांपूर्वी चोरी केले असल्याचे आढळून आले आहे.

वीज


हा प्रकार हॉटेल दीपक मध्ये घडला असून या वीज चोरी प्रकरणी आरोपी हॉटेल मालक दिपक अगले याच्याविरुद्ध अ.का.कभियंता हरेश भावर यांच्या फिर्यादीवरून नेवासे येथील पोलीस ठाण्यात कलम ४७६/२०२४ विद्युत कायदा २००३, कलम १३५ प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.ना.माने हे करत आहेत.

“” हॉटेल दीपकचा मालक दीपक अगले हा मागील दोन वर्षापूर्वी ही वीज चोरी करताना पकडला होता.तेव्हा त्याला वीज बिल व समज देऊन सोडण्यात आले होते.त्यानंतर काल १६ मे रोजी पुन्हा हॉटेल दिपक वर छापा मारल्यानंतर दुसऱ्या वेळेस ही वीज चोरी करताना पकडल्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या विद्युत कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे””

राहुल बडवे.
उप कार्यकारी अभियंता नेवासा.

newasa news online
वीज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वीज
वीज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वीज
error: Content is protected !!