ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कृषी

पाचेगाव – रासायनिक खतांसोबत होत असलेले लिकिंग बंद होण्यासाठी नेवासा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी तहसीलदार संजय बिराजदार व कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांना मंगळवार २ जुलै रोजी निवेदन नेवासा तालुका कृषी विक्रेत्याच्या वतीने देण्यात आली आहे.तसेच लवकरच रासायनिक खतांसबोत लिकिंग बंद करण्यात आली नाही तर कृषी चालकांनी बंद पुकरण्याचा इशारा ही यावेळी दिला आहे.


नेवासा तालुका कृषी विक्रेत्याच्या निवेदनात म्हटले की.वरील विषयांस अनुसरुन आम्ही नेवासा तालुका जि. अहमदनगर रासायनिक खते विक्रेते असोशिएशन च्या वतीने विनंतीपुर्वक निवेदन सादर करत आहोत की, आज आमच्या तालुक्यामध्ये रासयनिक खताच्या प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक ग्रेड सोबत काहीना काही लिंकिंग केले जात आहे. तसेच सध्या चालू असलेल्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या युरिया १८:४६:००, १०:२६:२६ आणि १५:१५:१५ या खतांसोबत सध्या गरज नसलेल्या अनावश्यक खते व औषधे याची विक्रेते बंधुना सक्ती केली जात आहे, आणि जर कोणी अनावश्यक खते व औषधे घेत नसतील तर त्या विक्रेत्यास आवश्यक असलेल्या रासायनिक खतांचा पुरवठा केला जात नाही.

कृषी


त्या सोबतच सदरील आवश्यक असणाऱ्या खतांचे वाहतुक भाडेही विक्रेते बंधुकडुन वसुल केले जात आहे. त्यामुळे येणारी आवश्यक खते निर्धारीत किमतीच्याही पुढे विक्रेते बंधुच्या दुकानात येऊने पडत आहेत. आणि वरुन लिकिंग घेत असल्यामुळे सध्या शेतकरी बंधुना आवश्यक असलेल्या युरिया १८:४६:००, १०:२६:२६ आणि १५:१५:१५ या सारख्या खतांची निर्धारीत किंमतीमध्ये विक्री करुन रासायनिक खताचा व्यवसाय करणे खुप कठीण होत आहे. शेतकरी यांच्या भावाना अशी झाली आहे की, खते दुकानदार हे आपल्या गळयात विनाकारण अनावश्यक खते व औषधे आपल्यावर लादत आहे. परंतु खरी वस्तुस्थिती ही शेतकरी यांना माहिती नाही. ही सर्व योजना कंपनीची असुन त्या योजने प्रमाणे खते विक्रीत्यास राबवावी लागत आहे. तसे न केल्यास खते विक्री करणाऱ्याची आर्थिक फार मोठे नुकसान होत आहे. त्याबाबत रासायनिक खते कंपनीने व शासनाने शेतकरी यांच्यामध्ये जनजागृती करावे.

कृषी


तरी आपण सदर लिकिंग प्रकरणात स्वतः लक्ष घालुन आवश्यक असणारी सर्व खते विक्रेते बंधुना पोहोच होतील (FOR) व त्या खतांसोबत येणारे लिकिंग बंद करण्यासाठी प्रयत्न कराल ही माफक अपेक्षा व तालुक्यातील कृषी विक्रेते आणि शेतकरी बंधु यांची या जाचातुन सुटका करावी हीच अपेक्षा नेवासा तालुका रासायनिक खते, बि-बियाणे व किटकनाशके असोशिएशन नेवासा च्या वतीने करण्यात येत आहे.सदरच्या खते लिकिंग बाबतच्या धोरनात शासनाने तातडीने लक्ष घालुन सदरची सर्व कृषी विक्रेते बंधु यांनी लिकिंग बंद न केल्यास तालुक्यातील आपली कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवून रासायनिक खते कंपनीच्या लिकिंग धोरण विरोधात बंद पुकारणार असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.

ठराविक रासायनिक खत कंपन्या आपल्या रासायनिक खतांसबोत इतर अनावश्यक खते सक्तीचे करतात,त्यामुळे कृषी चालकांचे भांडवल गोटले आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी केंद्र चालकांना सामोरे जावे लागत आहे. तरी या बाबीवर शासनाने योग्य तो उपयोजन राबवून रासायनिक खत घेताना शेतकऱ्यांना लिकिंग न करता उपलब्ध करून द्यावे.
बाबासाहेब खिलारी (उपाध्यक्ष) नेवासा तालुका कृषी संघटना
..

कृषी
कृषी
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी
error: Content is protected !!