ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सौंदाळा

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असे काहींना वाटते मात्र नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पालकांची नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे.
सौदाळा शाळेची स्थापना 1941 मध्ये झाली असून या शाळेमध्ये आज रोजी वर्ग एक ते पाच वर्ग आहेत. व 201 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसापासून स्पर्धा परीक्षेतील नेवासा परिसरातील केंद्र म्हणून सौंदळा पॅटर्न जिल्हा स्तरावर यशस्वी झाला आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परिसरातील गावांमधून विद्यार्थी दाखल होत आहेत. शाळेच्या प्रगतीबाबत अहवाल द्यायचा झाल्यास सन 2019 मध्ये या शाळेत पहिल्यांदा पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला. नवोदय विद्यालयात या शाळेतून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली असून
सन 2019….1
2020…..2
2022……7
2023……. 5
व 2024…..4
असे गेल्या सहा वर्षात एकूण 19 विद्यार्थी जवाहर नवोदय साठी निवडले गेलेले आहेत.
तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आजपर्यंत
2019….1
2020….. 9
2021….. 4
2022….. 13
2023…… 13
2024……7 (संभाव्य )
असे एकूण गेल्या सहा वर्षात 47 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली असून त्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळत आहे.

सौंदाळा


चालू शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आशिष येरेकर व जिल्हा शिक्षण अधिकारी मा.भास्कर पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या मिशन आरंभ परीक्षेमध्ये सौंदाळा शाळेतील जिल्हा गुणवंत्ता यादीत 14 तर तालुका यादी 14 अशा 28 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सन 2017 मध्ये शाळेचा पट 132 असा होता तर आज शैक्षणिक वर्ष 2024 अखेर या शाळेचा पट 201 इतका आहे.
शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेसोबतच स्नेहसंमेलना सारखे उपक्रम घेतले जात आहेत. चालू वर्षी स्नेहसंमेलनातून शाळेला जवळपास एक लाख रुपयांचा लोक सहभाग प्राप्त झाल्या आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग म्हणून सध्या शाळेमध्ये बालसंस्कार शिबिर सुरू आहे.
तसेच आगामी शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती वर्गाची ही तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.


शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुशिक्षित पालक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची प्रचंड मेहनत, ग्रामस्थ,गावातील ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्याकडून शाळेला होणारी आर्थिक व भौतिक मदत, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती चे शैक्षणिक व्यवस्थापनाबाबत सहकार्य, शाळेतील उच्चशिक्षित व अभ्यासू शिक्षक वर्ग, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे सूक्ष्म पर्यवेक्षण व मार्गदर्शन या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून ही शाळा जिल्हास्तरावर गुणवत्तेबाबत अग्रेसर म्हणून ओळखले जात आहे.
शाळेशी संपर्क केला असता नवीन शैक्षणिक वर्ष जून 2024 पासून सुरू होत आहे या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याचा सौंदाळा शाळेत प्रवेश घेण्यासाठी परिसरातील खूप पालक इच्छुक आहेत.
शाळेत प्रवेशासाठी आत्तापर्यंत सर्व वर्गात मिळून 70 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. शाळेतील भौतिक अडचण, इमारत याचा विचार करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. आज या शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री पोपट घुले यांच्या नियोजनामध्ये श्री कल्याण नेहूल राजेश पठारे रवींद्र पागिरे किशोर विलायते कल्पना निघुट संजीवनी मुरकुटे हे शिक्षक कार्यरत असून तालुका गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड यांच्या मार्गदर्शनात शाळेतील प्रवेश प्रक्रिया व अन्य कामकाज प्रभावी रित्या सुरू आहे.
मिशन आरंभ मध्ये श्री रवींद्र पागिरे सर ,कल्याण नेहुल सर श्री पोपट घुले सर हे जिल्हा स्तरावर ही मार्गदर्शक म्हणुन काम करतात

सौदाळा शाळेतील उच्च शिक्षित , उत्साही,उपक्रमशील आणि शिक्षकांमध्ये असणारे टीम वर्क यामुळे गुणवत्ते बरोबर इतरही उपक्रमात शाळा तालुक्यात, जिल्ह्यात अग्रस्थानी आहे
– शिवाजी कराड, गटशिक्षणाधिकारी

शाळेमध्ये प्रवेशासाठी इतर ठिकाणाहून 100 विद्यार्थी आहेत मात्र शाळेतील भौतिक सुविधा पाहून च प्रवेश देण्यात येतील
– श्री पोपट घुले, मुख्याध्यापक

सौंदाळा
सौंदाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सौंदाळा
सौंदाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सौंदाळा
error: Content is protected !!