ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दूध

नेवासा – शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना तसेच पंढरपूरला वाटचालीला असलेल्या वारकऱ्यांच्या संयुक्त विद्यमानाने बाबुळवेढा येथील नगर- संभाजी नगर हायवे वरती दूध ओतून दूध भावा संदर्भात केले रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
त्या आंदोलन प्रसंगी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यासह पंढरपूर येथे जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यांनी ही सरकारचा जाहीर दूध भाववाढी संदर्भात निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी परिपत्रकामध्ये म्हटले आहे की गाईच्या दुधाला 48 रुपये प्रति लिटर तसेच म्हशीच्या दुधाला 58 रुपये प्रति लिटर उत्पादन खर्च बेस्ट रेट म्हणून सरकारने जाहीर करावा तसेच 23नोव्हेंबर 30 जून पर्यंत दूध खरेदीदारांमधील भावांतर योजनेतील फरकाचे रक्कम 18 रुपये प्रति लिटर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशा विविध प्रकारच्या मागण्या या आंदोलन प्रसंगी करण्यात आल्या.

दूध

या आंदोलन प्रसंगी शरद जोशी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, संदीप गवारे, अंबादास कोरडे, दादासाहेब नाबादे, राजेंद्र शेळके स्वप्नील कोतकर, बापूसाहेब बारगळ, एकनाथ कवडे, पंढरपूर दिंडी सोहळ्यातील वारकरी मंदाबाई राठोड ,सागर कोतकर, तात्यासाहेब नवथर, संजय शेळके उपस्थित होते.

या दूध आंदोलन प्रसंगी बाबुळवेढा फाट्यावरती संभाजीनगर -अहिल्यानगर महामार्ग अडवला गेला होता तसेच रस्त्यावरती दूध ओतून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळ्यातील जाणाऱ्या कन्नड येथील शेतकरी वारकरी आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारच्या जाहीर निषेध वारकऱ्यांनी व्यक्त केला.

दूध
दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध
error: Content is protected !!