ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खते

नेवासा – शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी म्हणुन बोगस बियाणे खते विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी या साठी जिल्हा कलेक्टर तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी यांना विनंती करण्यात येते की जून महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे नेवासा तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये बोगस बी बियाणे विकत आहेत यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे व शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबावी कारण तालुक्यामध्ये अनेक कृषिसेवा धारकांनी बोगस बी बियाणे व खतांचा साठा भरला आहे सर्वसामान्य शेतकरी कृषी सेवा केंद्रात जाऊन बियाणे व खत विकत घेतात पण ती बोगस बी बियाणे खते कसे ओळखावे या बाबत शेतकऱ्यांना माहिती देणे खुप गरजेचंआहे या साठी शासनाने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन केले पाहीजे खतांचे दर दुप्पट लावले जाते प्रत्येक दुकानांमध्ये खताचा किंमत बोर्ड लावला जात नाही.

खते

नेवासा तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर जाऊन चेक करून सर्वांची पाहणी करा अशी मागणी नेवासा तालुक्यातील शेतकरी यांनी मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांच्याकडे केली आहे गणेश भाऊ झगरे म्हणाले की काही वर्षापासून नेवासा तालुक्यातील कृषी सेवा दुकानांमध्ये बोगस खत व बी बियाणे विकले जाते व खतांचा भाव हा टोकाला पोहोचला आहे. गोरगरीब शेतकरी कष्ट करून व सावकारा कडून पैसे काढून शेती करतो अशा शेतकऱ्यांवर होणारे अन्याय थांबवले पाहिजे बोगस बियाणे निघाले की शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान होऊन शेतकरी आत्महत्याचा विचार करतो माझी मागणी मा जिल्हा कलेक्टर कृषी विभाग अहमदनगर यांना विनंती आहे की प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर जाऊन चौकशी करा ज्या दुकानात बोगस बी बियाणे खते सापडतील त्या दुकानाचा परवाना रद्द करावा. अश्या दुकानावर कारवाई न झाल्यास नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले जाईल व तहसील कार्यालया समोर गणेश झगरे व शेतकरी उपोषणाला बसणार आहे असे गणेश भाऊ झगरे म्हणाले.

newasa news online
खते

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खते
खते

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खते
error: Content is protected !!