ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

केदारनाथ

नेवासा फाटा – नेवासा फाटा येथील जय भोले ग्रुपचे सदस्य दि.१७ रोजी श्री क्षेत्र केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत या ग्रुपचे हे ७ वे वर्ष असून यावेळी यात्रेसाठी अध्यक्ष अनिल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप खरात, राहुल कत्तेवार,राहुल जाधव, मारुती दिघे, मुकेश जाधव. दीपक शिरसाठ, अमोल महानोर, नाना पिटेकर, कपिल बांगर हे रवाना झाले आहेत भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमत असतात.

केदारनाथ

महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते. यावेळी यात्रेकरूंना मारुती खरात, सुभाष परदेशी, रवीशेठ कत्तेवार, आबा दवंगे, अनिल (सोनू परदेशी), दत्तू दिघे, सचिन उगले, विनायक शिरसाठ, रमेश कांगुणे, महेश पारखे, साजन महानोर, बालू बांगर, लंकेशराजे जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

newasa news online
केदारनाथ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

केदारनाथ
केदारनाथ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

केदारनाथ
error: Content is protected !!