ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

श्रीराम

नेवासा – श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये   महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विदर्भ रत्न रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या संगीतमय तुलसी रामायण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामायणाचार्य हभप रामरावजी महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून ही कथा दि.११ ते १८ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ७ ते १० यावेळेत होत आहे. या सोहळयाच्या निमित्ताने दि.११ ते दि.१७ एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते १२ यावेळेत किर्तन महोत्सव  होत आहे.

महोत्सवात हभप दयानंद महाराज कोरेगावकर, देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, बीड येथील ह.भ.प.श्री अमृताश्रम स्वामी महाराज यांनी भेटी देऊन किर्तन सेवा दिली आहे. बीड येथील महादेव महाराज राऊत, सावखेडा येथील गिरी आश्रमाचे महंत श्री कैलासगिरीजी महाराज, पैठण येथील भागवताचार्य साध्वी सुवर्णानंद चैतन्य, दि.१७ एप्रिल रोजी रामनवमी निमित्त महंत परमहंस मुक्तानंद महाराज वेल्हाळे संगमनेर यांचे किर्तन होणार असून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करून श्री रामजन्मोत्सव साजरा होणार आहे. रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या संगीतमय रामकथेने भाविक मंत्रमुग्ध होत आहे,कथा समारोप प्रसंगी सेवेकरी दाम्पत्याच्या हस्ते रात्री महाआरतीने येथील परिसर रामनामाच्या धूनने राममय झालेला दिसत आहे.

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे शिक्षक प्रा.अशोक गाडे सर यांच्या बहारदार शैलीतील निवेदन ही सर्वांना आकर्षित करत आहे.
गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी ह.भ.प.पांडुरंग गिरी महाराज वावीकर यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने आठ दिवस चालणाऱ्या श्री रामजन्मोत्सव व किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे. दुपारी ३ वाजता त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक मेजर साहेबराव घाडगे पाटील यांच्या सौजन्याने कुस्त्यांचा जंगी होणार आहे. श्रीरामजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित संगीतमय  तुलसी रामायण कथा व  होणाऱ्या किर्तन महोत्सवात होणाऱ्या किर्तन श्रवणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी केले आहे.

श्रीराम
श्रीराम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीराम
श्रीराम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीराम
Share the Post:
error: Content is protected !!