ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

स्टार्टर

खेडले परमानंद येथील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारीच्या स्टार्टर चोरीच्या घटनेत वाढ. आरोपी पोलिसांच्या  रडारखर.

खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील मुळाथंडीच्या गावातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्समधील स्टार्टर चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्यामुळे मुळाथडीच्या खेडले परमानंद, शिरेगाव, पानेगाव, निंभारी आदी गावामधून बरेचसे स्टार्टर चोरीला गेले चोरांनी आपला मोर्चा स्टार्टर चोरीकडे वळविला असल्याने   त्यामुळे या भागातील शेतकरी  त्रस्त झाला आहे आज बाजारामध्ये नवीन स्टार्टर घ्यायचे झाल्यास दोन ते अडीच हजार रुपये लागतात नेमके हे चोर स्टार्टरवर डल्ला मारत असल्याने बळीराजाला दुसऱ्या दिवशी स्टार्टर विकत घेऊन पंप चालू करावा लागतो.

त्यामुळे या स्टार्टर चोरांचा पोलिसांनी शोध लावावा अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे दिवसेंदिवस या घटनेमध्ये वाढ होत आहे खेडले परमानंद येथील बऱ्याचशा इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्स मधून स्टार्टर चोरी गेली असल्याने पॅनल बॉक्समध्ये फक्त कट आउट फक्त शिल्लक राहतात एक तर पाण्याचा दुष्काळ त्यात अशा  चोरीच्या घटना घडत आहेत सातत्याने स्टार्टर चोरीच्या घटना घडत असल्याने रात्र जागून काढण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यावर आली आहे हे भुरटे चोर स्थानिकच असल्याची शंका शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे याप्रकरणी पोलिसांनी बारीक तपास करून या स्टार्टर चोरांना आळा घालण्याची मागणी होत आहे .

स्टार्टर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्टार्टर
स्टार्टर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्टार्टर

    

error: Content is protected !!