ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

घोडेश्वरी देवी

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रौत्सवास शुक्रवार दिनांक २६ एप्रिल पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गायनाचार्य हभप. विकास महाराज देवढे ( कर्जतकर ) यांच्या किर्तनाने सुरुवात झाली. शनिवार दि. २७ एप्रिल रोजी विनोदाचार्य, टीव्ही स्टार समाजप्रबोधनकार, हभप शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन झाले. रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी समाज प्रबोधनकार हभप.निवृत्तीनाथ महाराज देशमुख ( इंदोरीकर ) यांचे जाहीर हतिकीर्तन होणार आहे.

प्रवरासंगम येथून गंगेचे आणलेल्या पाण्याची यात्रेच्या मुख्यदिनी सोमवार दि. २९ एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजता कावडी मिरवणूक निघणार असून, देवीस गंगास्नान व सकाळी ९ वाजता श्री घोडेश्वरी देवीस चोळी – पातळचा कार्यक्रम, महाआरती व प्रसाद वाटप होईल. रात्री ७ वाजता पालखी मिरवणूक, रात्री ९ वाजता हारूनभाई इसाकभाई वांबोरीवाले व अन्सारभाई शेख मिरीकर यांचा शोभेच्या दारू कामाचा सामना होईल, रात्री १० वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध सौ. मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मोफत दाखवण्यात येणार आहे.

मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते १ मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य मंडळाची देवहजेरीचा कार्यक्रम होईल. मंगळवारी रात्री १० वाजता कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मोफत दाखवण्यात येईल. मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भव्य जंगी हगामा आयोजित केला असून, महिला कुस्ती आयोजित करण्यात आली आहे. १ मे रोजी यात्रा उत्सवा करिता देणगी देणाऱ्या देणंगीदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गुरुवार दि. १६ मे रोजी सय्यद बाबांचा संदल निमित्त रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्य यात्रा सोमवार दि. २९ एप्रिल रोजी असून, सर्व भाविक भक्त,ग्रामस्थ,दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, खेळाडू,कलाकार,ढोलताशावाले, बँडवाले, लेझीम पथक, सोंगवाले, नाच व तामशावाले यांनी यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन श्री घोडेश्वरी देवी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

घोडेश्वरी देवी
घोडेश्वरी देवी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घोडेश्वरी देवी
घोडेश्वरी देवी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घोडेश्वरी देवी
error: Content is protected !!