ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराज

नेवासा – तालुक्यातील श्रीराम आश्रम मुकिंदपुर येथे सुरू असलेल्या भव्य दिव्य राम कथा सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी काल सायंकाळी कथेला सदिच्छा भेट दिली व कथेच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प श्रवण केले. यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आशीर्वाद पर बोलताना म्हणाले की प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये त्याग, समरसता भरपूर भरलेली आहे म्हणून राम कथा ढोक महाराजांच्या नसानसामध्ये राम कथा भरली आहे. ढोक महाराजांना विदर्भ रत्न म्हणून ही पदवी लाभलेली आहे कोणत्याही श्रेष्ठ वक्त्याच्या तोंडून राम कथा आयकली तरी पोट भरत नाही.

आज कथे मधे सुंदररीत्या रामचंद्र भगवंताचा जन्म सोहळा कथेमध्ये संपन्न झाला सर्वांनी पुष्पवृष्टी केली पाळणा झाला म्हणून एकच म्हणावं वाटतं झाले राम राज्य काय ऊने आम्हासी धरणी धरली पिके गाई ओढल्या म्हशी ही सर्व समृद्धी रामाचा अवतार झाला हा बाह्य विचार केला आहे. आपण जीवनात त्यागाला, समरसतेला लहानाचं कौतुक मोठ्याचा आदर जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत सुखाचे दिवस येत नाही हेच राम कथा शिकवते. शेकडो भाषांमध्ये रामकथा आहे देश विदेशामध्ये रामकथा पोहचली आहे या अधी टीव्हीवर रामायण चालू होत होते त्यावेळेस सर्व जाती धर्मातील लोक रामायण पाहत होती म्हणून राम कथा ही पवित्र आहे.

मोठ्या श्रद्धेने भावनेने ही राम कथा आपण ऐकत आहोत राम कथा ऐकल्यावर रामा सारखे सुविचार आपल्या मध्ये आल्याशिवाय राहणार नाही ढोक महाराजांच्या वाणी मधून सुंदर राम कथा या ठिकाणी सादर होत आहे त्या वाणीला उत्तमो उत्तम फळ प्राप्त होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्रीराम आश्रम मुकुंदपुर येथे सुरू असलेल्या राम कथा सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते.

या वेळी श्रीराम आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी सर्वांचे आभार मानले देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह. भ .प भास्करगिरीजी महाराज (बाबाजींचे) तसेच कथाकार वक्ते ह. भ .प ढोक महाराजांचे संत पुजन केले. ही भव्य दिव्य राम कथा ऐकण्यासाठी श्रीराम आश्रम येथे लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होत आहेत. ही रामकथा सायंकाळी सात ते दहा या वेळामध्ये संपन्न होत आहे. तरी कथेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहुन कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी भाविकांना केले.

महाराज
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज
error: Content is protected !!