ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बाजार


घोडेगाव – शुक्रवारचा घोडेगाव बाजार मुळे वाहतुक जाम झाली. बाजार समिती प्रवेशद्वाराच्या दक्षीण व उत्तर बाजुस दोन कि मी पर्यंत सकाळी सात वाजल्या लहान मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .
घोडेगाव येथील जनावरांचा बाजार महाराष्ट्रात च नव्हे तर परराज्यात देखील प्रसिद्ध आहे. जनावरांच्या बाजारात गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्या खरेदी विक्री साठी मोठी गर्दी असते. जनावरे वाहतुकीसाठी ट्रक, टेम्पो, छोट्या मालवाहू गाड्या रिक्षा,मोटरसायकल या सारख्या वाहनांची गर्दी असते. भाजी पाला , धान्य, कृषी अवजारे,सह दैनंदिन जीवनातील लागणा-या वस्तु चार येथे मोठ्या प्रमाणात बाजार असतो त्यांनाही वाहतुकीसाठी वाहने लागतातच.

नगर संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव आहे बाजार ही रस्त्याच्या कडेलाच बाजार समिती पश्चिमेला तर भाजी बाजार पुर्वेला भरतो. अनेक विक्रेते महामार्गावरच आपली दुकाने मांडतात. कृषी अवजारे, फळ विक्रेते, महामार्गावर बिनधास्त दुकान थाटतात. बाजार समिती प्रवेश द्वारा पासुन चिखलाचे साम्राज्य सुरु होते. जनावरे उभी करण्यास जागाच नसते. त्यातच वाहने आत नेण्यासाठी प्रवेशद्वार अपुरे पडत आहे. सोमवार बुधवार शनिवार कांदा लिलाव असतो. यावेळी ही कांदा भरणा-या मोठ्या गाड्या ची वर्दळ असते. त्यातच बाजार समिती चार वजनकाटा प्रवेशद्वारा जवळ असल्याने वजन करण्यासाठी गाड्यांची लाईन महामार्गावरच लागते.

बाजार समिती मधे सर्वत्र चिखलच झाला असल्याने गाड्या साठी वाहनतळ ही नाही. साधे पायी फिरता येत नाही. परिणामी सर्वच वाहने रस्त्यावर उभी केल्याने वाहतुक तासन् तास जाम होते. सोनई पोलिस स्टेशन अंतर्गत घोडेगाव येते येथे वाहतुक पोलिस नेमणुकी साठी स्पर्धा असते. मात्र वाहतुक कायदा अन् सुव्यवस्थेसाठी हे कर्मचारी झटताना दिसत नाही. अनेक वेळा वाहतुक हवालदार गायबच असतात.
ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा, सोनई पोलीस स्टेशन यांनी समन्वयाने महामार्गावरील वाहतुक समस्या साठविणे गरजेचे आहे.

वाहनतळासाठी बाजार समिती, ग्रामपंचायतने जागा द्यावी. जेणे करुन बाजारासाठी आलेली सर्व वाहने एकाच ठिकाणी थांबतील . रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहित. वाहतुकही जाम होणार नाही.
पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतने रस्त्यावर दुकान असणार नाहित याची काळजी घ्यावी.

बाजार
newasa news online
बाजार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाजार
बाजार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाजार