ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

Mumbai Road Accident News : मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. यात तरुण दगावल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Road Accident News : पुण्यातील हिट अँड रन (Pune Porsche Car Accident) प्रकरण सध्या चर्चेत आहे. या अपघातात अल्पवयीन आरोपीनं पोर्शे गाडीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यानंतर आरोपीला मिळालेला जामीन यांमुळे हे प्रकरण संपूर्ण देशभरात पोहोचलं. अशातच आता विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याप्रमाणेच (Pune News) राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai Accident) अपघात झाला आहे. या अपघातात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. दुचाकीच्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एक 15 वर्षांचा मुलगा बाईक चालवत होता आणि त्यानं 32 वर्षांच्या माणसाला धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत इरफान नवाब अली शेख नावाचा व्यक्ती गंभीर झाला. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भायखळा येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

मुंबईत अल्पवयीन दुचाकीच्या धडकेनं एका व्यक्तीचा मृत्यू 

मुंबईत रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 3, 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident
error: Content is protected !!