ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराज

नेवासा – तालुक्यातील भूलोकी स्वर्ग म्हणून ओळख असलेले देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज हे आज गीडेगाव येथे काका पाटील कर्डिले यांच्या निवासस्थानी आमरस भोजनासाठी आले होते यावेळी बोलत होते.

यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज बोलताना म्हणाले की राष्ट्राला बळकटी देणारा धर्म हा मठ मंदिरामधून निर्माण होत असतो तसेच प्रत्येक चांगला कामांमध्ये विरोधा होत असतो आणि विरोधक हा टिकले पाहिजे परंतु विरोध करून चांगले कामे बिघडेल अशा ठिकाणी कदाचित कोणीही विरोध करता कामा नये.

आपण फक्त धर्माचा विचार केला पाहिजे तसेच ते पुढे देवगड देवस्थानच्या बद्दल बोलताना म्हणाले की देवगड देवस्थान हे आज गुरुवर्य किसनगिरी बाबांच्या कष्टाचे फळ आहे त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर मंदिर हे वैकुंठवासी ह.भ.प बन्सी महाराज तांबे यांनी उभा केलेल फळ आहे त्यांचं स्मरण ठेवून जात ,पक्षाचे, गोतावळ्याचे विचार आपण थोडे बाजूला ठेवून आपल्याला धर्माचे काम करायचं आहे . त्यामुळे उद्या ज्ञानेश्वर देवस्थानचा मठाधीपती सोहळा उद्या नेवासा ज्ञानेश्वर मंदिर येथे पार पडणार आहे त्या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांनी बोलताना केले.

महाराज

ते पुढे बोलताना म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये यामागे काम करणारे संतही गेले व यापुढेही येत राहतील जात राहतील तसेच ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य हे आपल्याला तालुक्यामध्ये श्रद्धेने संभाळायचे आहे काही झाले तरी आपण सर्व एकत्र आहोत गाव असेल पक्ष असेल तसेच आपल्याला नेतृत्व सांभाळायचे आहे व सर्वांना सोबत घेऊन आपल्याला ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे उत्कृष्ट काम करायचे आहे.

तसेच उद्या बहुसंख्येने ह .भ. प. देविदास महाराज यांच्या मठातीपती सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी बोलताना सर्वांना केली.

या कार्यक्रम प्रसंगी ह. भ. प देविदास महाराज मस्के बोलताना म्हणाली की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आम्ही मालक नव्हे तर दास आहोत मी ज्ञानदेवाचा दास असून मी फक्त ज्ञानेश्वर देवस्थान येथे सेवा करण्यासाठीच आलेलो आहे. धन आणि मान हे मिळवण्यासाठी आम्ही संप्रदायात आलेलो नाही दास डोंगरी राहतो जत्रा देवाची पाहतो आपल्या सर्वांचे आशीर्वादाने कल्याण होणार आहे असे बोलताना उद्या होणाऱ्या ज्ञानेश्वर देवस्थानचे मठाधिपती ह. भ .प देविदास महाराज मस्के बोलताना यावेळी म्हणाले.

महाराज

यावेळी देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की ज्यांनी ज्यांनी साधूंची सेवा केली त्यांचे आतापर्यंत कल्याणच झाले आहे त्याची प्रचिती त्याचा अनुभव आपण सर्व भक्ती मंडळी देवगड देवस्थानच्या रूपाने घेतो आहे सद्गुरु बाबांच्या कृपेने प्रापंचिक जीवन ही सुख समाधानाचे जात आहे प्रापंचिक जीवन ही सुख व समाधानाचे होण्याकरता संतांच्या सानिध्याची व आशीर्वादाची गरज आहे काका पाटील कर्डिले हे दरवर्षीप्रमाणे संतांची सेवा करत असतात हे सर्व संतांच्या आशीर्वाद आहे ही सर्व सेवा त्यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे घडते आहे हे त्यांचे परम भाग्य आहे.

या कार्यक्रम प्रसंगी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, ह भ प दिनकर महाराज मते,ह. भ. प मा. आ. पांडुरंग अभंग,
ज्ञानेश्वर देवस्थान येथे नव्याने नियुक्त होणारे मठाअधिपती ह .भ .प देविदास महाराज मस्के
ह .भ. प रामनाथ महाराज पवार, ह .भ .प .सुदाम बाबा ददणेश्वर देवस्थान दहिगाव, ह भ प अशोक महाराज बोरुडे, ह. भ .प राम महाराज चोपडे, , देवगड देवस्थानचे चोपदार बाळासाहेब महाराज कानडे, ह .भ. प चांगदेव महाराज काळे, ह भ प साळुंके महाराज ,विठ्ठलराव लंघे, मुळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन कडूबाळ पाटील कर्डिले, काका पाटील कर्डिले, नवनाथ साळुंके, काका पाटील कर्डिले तसेच पंचक्रोशीतील श्री समर्थ किसनगिरी बाबा भाविक भक्त महिला भावी भक्त तसेच सर्वपक्षीय नेते या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे आठराव्या वर्षाच्या आमरस भोजन प्रसंगी हे सर्व उपस्थित होते .

महाराज
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज

l

error: Content is protected !!