ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

किसनगिरी बाबा

नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे सदगुरू किसनगिरी बाबांच्या सुरू असलेल्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाची
गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी बाबांच्या हस्ते दहीहंडी व देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.यावेळी बोलताना स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की सदगुरू किसनगिरी बाबा हे सामान्य विभूती नव्हे तर ते अवतारी संत होते.वणवण फिरले कणकण झिजले म्हणून भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी गुरुदेव दत्त पिठाची निर्मिती केली.भक्तांसाठी त्यांनी मंदिराच्या रूपाने मोठा प्रसाद परिसराला दिला,पशू पक्षी प्राणिमात्रांवर देखील त्यांनी प्रेम केले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

श्री समर्थ सदगुरू बाबांनी दिलेल्या शिकवणीनुसारच आज शांतीब्रम्ह असलेले देवगडचे सदगुरू बाबांनी देखील
नियम म्हणजेच जीवन करून घेतले. सात्विक असणं हेच महंत भास्करगिरी बाबांचे स्वरूप असून त्याग, समर्पण,तपश्चर्या भक्ती, गुरूंबद्दल असलेली निष्ठा त्यांनी अंगिकारली म्हणून भू लोकीवर स्वर्गाच्या रूपाने देवगड क्षेत्राची निर्मिती झाली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी भगवंताच्या बाल लीलांचे वर्णन त्यांनी केले.भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे संपूर्ण चरित्र हे अगाध व मधुर अनुपम अलौकिक असे असून समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद जरी केला तरी त्याचे वर्णन हे शब्दांनी करता येणार नाही,वैकुंठामध्ये ही दुर्लभ आलेला व देव आणि भक्तांचे ऐक्य असलेला  काला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी महंत भास्करगिरी बाबा यांच्या समवेत मधुकर महाराज पेसोडे, बालब्रम्हचारी विश्वनाथगिरीजी महाराज, नारायण महाराज ससे, गणपत महाराज आहेर, बाबासाहेब महाराज सातपूते, विजय महाराज पवार, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील, बाळकृष्ण महाराज कानडे, यांच्यासह सेवेकरी, वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किसनगिरी बाबा
Share the Post:
error: Content is protected !!