ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अत्याचार

Ahilyanagar News : शेतात शेतमजुरीचे काम करणाऱ्या अल्पवयीन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जमिनावर असतानाच त्याने परत एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला.

Ahilyanagar News : शेतात शेतमजुरीचे काम करणाऱ्या अल्पवयीन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जमिनावर असतानाच त्याने परत एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला.

दरम्यान त्या मुलीने एका मुलीला देखील जन्म दिला आहे. परंतु येथील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा भयंकर प्रकार समोर आला आहे. याबाबत पीएमटी रुग्णालयात असलेल्या ‘त्या’ बालमातेच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील ज्ञानेश्वर बोडखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शेतात दोन दिवस शेतमजुरीचे काम करणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री घरात झोपलेली असताना तिच्या खोलीत जात तिच्याशी झटून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर बोडखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यात त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. परंतु जामीनावर असताना देखील त्याने एका वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. तिच्याशी ठेवलेल्या शरीर संबंधातून ती गर्भवती राहिली. प्रसूतीसाठी तिला लोणीच्या पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या अल्पवयीन मुलीने या रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र येथील डॉक्टरानी या मुलीला विश्वासात घेत अधिक माहिती विचारली असता त्यानंतर तिने सांगितले की, ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे यांने वारंवार अत्याचार केला. तिच्याशी ठेवलेल्या शरीर संबंधातून ती गर्भवती राहिली. अन आता मुलीला जन्म दिला.

या बाबत आरोपी ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (२२ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

त्याला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे करत, पोलीस कोठडीची मागणी केली असता त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अत्याचार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अत्याचार
अत्याचार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अत्याचार
error: Content is protected !!