ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अत्याचार

Ahmednagar Crime News : एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समजली आहे. तिघे आरोपी फरार झाले आहेत.

Ahmednagar Crime News : एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समजली आहे. तिघे आरोपी फरार झाले आहेत. एका कॅफेमध्ये विद्यार्थीनीला नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक म्हणजे म्हणजे या विद्यार्थीनीला श्रीरामपूरनंतर शिर्डीमध्ये नेवून तेथेही तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. यातील अत्याचार करणारे तिघेही आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या शिरसगाव आणि माळेवाडी येथील असल्याची माहिती समजली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या एका कॅफे मध्ये  एका १७ वर्ष वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार करत अत्याचार केला. तर याच विद्यार्थीनीवर शिर्डीतील एका हॉटेलमध्ये नेत एका आरोपीने बळजबरीने अत्याचार केला.

अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहीक अत्याचार केला म्हणून पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी ललीत, रा शिरसगांव, अनिकेत व महेश, दोघे रा. माळेवाडी या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे, पोनि. नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून सपोनि. आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, घटनेतील तीनही आरोपी फरार झाले आहेत. शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणात आणखी काही जणांना आरोपी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित आहेत. जिल्ह्यातील अत्याचारासंदर्भात घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. पोलिसांनी यावर कडक कारवाई करत गुन्हेगारांवरही कडक कारवाई करण्याची अपेक्षा जनता करत आहे.

अत्याचार
अत्याचार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अत्याचार
अत्याचार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अत्याचार
error: Content is protected !!