ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सौंदाळा

नेवासा – सौंदाळा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता ई. प्रकारच्या एकल महिलांच्या पुनर्विवाह साठी ११,०००/- आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले.

ज्या एकल महिलांना पुनर्विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना ग्रामपंचायत मार्फत आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. पतीचे निधन झाल्याने महिलेला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. साथीदार गमावल्यानंतर येणारे दडपण देखील मोठे असते. बऱ्याचदा अश्या महिला या सामाजिक आधार गमावतात तसेच त्यांना उत्पन्नाचे साधन देखील गमवावे लागते त्यामुळे अशा महिलांचे पुनर्वसन व्हावे व समाजात एक चांगला संदेश प्रसारित व्हावा अशी लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांची इच्छा होती.

सौंदाळा


अकाली आलेले विधवा पण, खांद्यावर लहान लेकरांची जबाबदारी आणि शिक्षणाचा खर्च, लवकर आलेल्या विधवा पण मुळे माहेरात राहावे लागणे, विविध टोमणे व इतर त्रासाला सामोरे जाणे ई. मुळे एकल महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रमोद झिंजार्डे यांच्या ‘ विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा ‘ या अभियानाला नजरेसमोर ठेवून सरपंच शरद आरगडे यांनी सदरची योजना कार्यान्वीत करून अंमलात आणली आहे.
सौंदाळा ग्रामपंचायत गावातील एकल महिलांच्या पुनर्विवाह करण्यासाठी संबंधित महिलेला ११,०००/- अनुदान स्वरूपात देणार आहे.

सदर योजनेमुळे समाजात एक चांगला संदेश प्रसारित होऊन सर्व वंचित आणि गरजू महिलांना त्याचा निच्छित फायदा होईल असे दिसून येत आहे. सदर योजनेला आमची लेक, आमची जबाबदारी या नावे कार्यान्वीत केले असून सौंदाळा ग्रामपंचायत ही एकल महिलांना मदत करणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे .

सौंदाळा
सौंदाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सौंदाळा
सौंदाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सौंदाळा
error: Content is protected !!