ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

संजय बिरादार

नेवासा – आपल्या अंगणातील अथवा घरा जवळील वापरात नसलेल्या विहिरी, आड, बारवा,व कूपनलिका, यांना संरक्षण कठडे बसवणे हि काळाची गरज असून नागरिकांनी या बाबत काळजी घ्यावी असे आवाहन नेवासे तहसीलदार संजय बिरादार यांनी केले आहे.

घर, शेती, व शहरातील प्रभागामध्ये व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे वाकडी येथील घटना मनाला चटका लावून जाणारी घडली आहे अनेक वर्षांपासून जनावरांच्या गोठ्यातील शेण, कचरा व मलमूत्र साठवण करणाऱ्या विहिरी खेडोपाडी काही ठिकाणी उपलब्ध आहेत याला देखील भिंती अथवा उत्तम दर्जाचे कठडे बसावे संबंधित मालकांनी बसावे जेणेकरून काही विपरित घटना घडणार नाही.

लवकरच कूपनलिका व बारव सुरक्षित आहेत का, याचे प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून धोकादायक असलेले आड, विहिरीची संबंधित गावं पातळीवरील पोलीस पाटील,तलाठी व कोतवाल यांच्या कडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार आहोत असे हि बिरादार म्हणाले.


तालुक्यातील सर्व धोकादायक विहिरी, आड व बारवांची संबंधित मालकांनी तसेच शेतकरी बांधवानी, योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर कराव्या जेणेकरून काही अनुचित प्रकार घडणार नाही.
– संजय बिरादार, तहसीलदार नेवासा

newasa news online
संजय बिरादार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संजय बिरादार
संजय बिरादार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संजय बिरादार
error: Content is protected !!