ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मळगंगा देवी

नेवासा –निघोजवरून नेवासा येथे आणलेल्या श्री मळगंगा देवीच्या पालखीचे नेवासा शहरात फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. देवी भक्त रेणुकादास घोलप यांनी पालखी मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणूक प्रसंगी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

नेवासा येथे एसटी स्टँड जवळ असलेल्या मळगंगा देवीच्या मंदिरापासून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी निघोज येथून आणलेली श्री मळगंगा देवीची घागर व पालखीचे सुवासींनीनी पंचारती ओवाळून स्वागत केले.- अग्रभागी झेंडा काठी, बँड पथक, त्यामागे सनई-चौघडा पथक, पुष्पांनी सजविण्यात आलेली न मळगंगा देवीची पालखी व पालखी – मागे देवीच्या नावाने जयघोष करणारे भाविक असे या पालखी. मिरवणुकीचे स्वरूप होते.

मळगंगा देवी

नेवासा शहरातील एस टी स्टँड, नगरपंचायत चौक, शहरातील मुख्य पेठेतून पालखी काढण्यात आली. या पालखीचे नेवासेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करून – दर्शन घेतले. पालखी मिरवणुकीत देविभक्त रेणुकादास घोलप, सुमनताई घोलप, जयश्रीताई घोलप, परशूराम घोलप, लताताई घोलप, रामभाऊ घोलप, ज्योती घोलप, सचिन घोलप व जयश्री घोलप, सागर घोलप, वैशाली घोलप, संदीप घोलप, भारती घोलप, स्वप्नील घोलप, ज्योती घोलप या दाम्पत्याच्या हस्ते मळगंगा देवीच्या घागरीसह पालखीतील देवीच्या मुखवट्यांचे पूजन करण्यात आले.

पालखी मिरवणुकीत सलग चौदा वर्षांपासून नेवासा ते निघोज पायी पालखी सोहळ्याचे सेवेकरी अमोल कदम, बाळासाहेब म्हसे, ज्ञानेश्वर झेंडे, विष्णू जाधव यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते. चौकाचौकांत पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. मिरवणुकीचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीचा मंदिर प्रांगणात समारोप झाल्यानंतर पालखीचे असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. संबळाच्या निनादात मंदिरात महाआरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री देवीच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

newasa news online
मळगंगा देवी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मळगंगा देवी
मळगंगा देवी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मळगंगा देवी
error: Content is protected !!