ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दिंडी

नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्यावतीने काढण्यात येणाऱ्या पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडीचे मंगळवार दि. २ जुलै रोजी प्रस्थान होणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. दिंडी सोहळ्याचे हे ५५ वे वर्ष आहे. दिंडी १४ जुलै रविवार रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे.

या दिंडीमध्ये येण्याची इच्छा असल्यास, त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानशी संपर्क साधून आशिष कावरे यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन विश्वस्त विश्वासराव गडाख, भिकाजी जंगले, ज्ञानेश्वर शिंदे, माधवराव – दरंदले, कैलास जाधव, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे यांनी केले – आहे. पंढरपूर येथे अहिल्याबाई होळकर चौकातून डावीकडे पखालपूर – गणपती रोड याठिकाणी असलेल्या संत ज्ञानेश्वर संस्थानच्या जागेवर दिंडीचा १४ ते १८ जुलैपर्यंत मुक्काम राहणार असून दिंडी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

दिंडी
newasa news online
दिंडी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिंडी
दिंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिंडी
error: Content is protected !!