ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पिक विमा

नेवासा – तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कपाशी, तूर, सोयाबीन इ. पिकांचा पिक विमा उतरवला होता, पावसाचा मोठा खंड पडल्याने आपला नेवासा तालुका दुष्काळाच्या ट्रिगर मध्ये बसलेला आहे तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याच्याही अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु अद्याप एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच सोयाबीन या पिकांचे २५% अग्रीम रक्कम मिळाली आहे परंतु उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही ही रक्कम मिळाल्यास आगामी हंगामामधे शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खते घेण्यासाठी मदत होणार आहे.

तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन पुढील १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्यात यावी अन्यथा जीवन ज्योत फाऊंडेशन च्या व तीने आपल्या कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रूपया उधळो आंदोलन करण्यात येईल व काही अनुचित प्रकार घडला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला संबंधित शासकीय यंत्रणा आणि त्या विभागातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन कृषी मंत्री धनंजय मुंडे व जिल्हा आधिकारी यांना पाठवण्यात आले.या वेळी जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले पाटील,छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,अक्षय बोधक,आप्पासाहेब आरगडे,राहुल कांगुणे, अभिजीत बोधक,जैद शेख,विजय खरात,प्रदिप आरगडे,प्रतिक आरगडे,तोफिक शेख आदी शेतकरी सहकारी उपस्थित होते.

newasa news online
पिक विमा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पिक विमा
पिक विमा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पिक विमा
error: Content is protected !!