ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शेती

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील माका येथील शेतकरी सुदाम गिरिधर पालवे यांनी दि. ५ जुन रोजी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती की दि २७ मे रोजी आपल्या शेतातील शेड मधुन इलेक्ट्रीक पंप, जनरेटर ,केबल , ग्रियुज लाॅम्बाॅडींग कंपनीचे ५ एच पी चे मशीन असे शेती उपयोगी साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्या बाबत दाखल फिर्यादी मध्ये म्हटले होते. सदर घटनेचा तपास पो. हे. काॅ. आप्पा तमनर हे करत होते.

तपास दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी सदरच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करत गुप्त बातमीदार यांचे आधारावर संपत उर्फ संदिप दादाभाऊ सांगळे वय. २७ , ऋषिकेश भाऊसाहेब केकाण वय १८ दोघे राहणार महालक्ष्मी हिवरे या दोघा संशयितांन ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना दि. ११ जुन रोजी रीतसर ताब्यात घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे , उप. विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके ,

पो. उप. निरीक्षक सुरज मेढे, पो. हे. काॅ. आप्पा तमनर, पो. ना. नानासाहेब तुपे, पो. काॅ. ज्ञानेश्वर आघाव, पो. काॅ. रविकांत गर्जे, पो. काॅ म्रुत्यंजय मोरे, पो. काॅ. निखिल तमनर, तसेच उत्तर मोबाईल सेल श्रीरामपूर चे पो. ना. सचिन धनाड,पो.ना.संतोष दरेकर, पो. ना. रामेश्वर वेताळ यांनी केली. अवघ्या चोवीस तासात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सोनई पोलीसांना यश मिळाले..

शेती
शेती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेती
शेती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेती
error: Content is protected !!