ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कृषि

नेवासा – महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषि महाविद्यालय, सोनई कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत नेवासा तालुक्यातील बिलपिंपळगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषिदूत देणार आहेत. बेलपिंपळगाव येथे कृषिदुतांचे स्वागत गावचे सरपंच मा.श्री.कृष्णा शिंदे पाटील, उपसरपंच. मा.श्रीमती सुनिता कांगुणे, कृषी सहाय्यक.मा.श्री. निलेश बिबवे साहेब,ग्रामसेवक कृष्णा बडे साहेब तसेच माजी सरपंच मा. श्री. चंद्रशेखर गटकाळ, माजी उपसरपंच. मा.श्री.बाळासाहेब भांड ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी केले.

कृषिपदवीच्या अभ्यासक्रमाच्या अतंर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषि जागरूकता हा प्रात्यक्षिक कार्यक्रम कृषी महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतो. यादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांचे जीवनमान, सामाजिक आर्थिक स्थर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परीक्षण व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन, हवामान सल्ला, बाजार भाव व आधुनिक तंत्रज्ञान या बद्दल माहिती देणार आहेत. कृषि औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेवटच्या चार आठवड्यामध्ये विद्यार्थी कृषि आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेणार आहेत.

कृषि

तसेच बेलपिंपळगावा मध्ये कृषि महाविद्यालय सोनई, अतंर्गत ग्रामीण भागातील तरूणांना कृषि-क्षेत्रातील विविध प्रकारच्या योजना तसेच त्याबद्दल २ दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.जी.मोरे, उप-प्राचार्य एस.व्ही.बोरुडे,कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल ए. दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस. गोंधळी व इतर विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती कृषिदुत कु.पुष्पक देवरे यांनी दिली. यावेळी इतर कृषिदूत शाम चौधरी, तेजस भोस, संकेत औटी, अविनाश देवकाते हे विद्यार्थी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत राहतील.

newasa news online
कृषि

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषि
कृषि

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषि
error: Content is protected !!