ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराज

ह.भ.प.वेद शास्त्र संपन्न देविदास महाराज म्हस्के यांचा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सेवेचा पदभार समारंभ उत्साहात साजरा.

नेवासा – खूप कष्टातूंन हे देवस्थान उभे राहिले सेवा समाजाचे धर्म कार्य आहे या ठिकाणी आजची निवड हि सर्व महाराज मंडळी,नेवासकर मंडळी, व सर्व राजकिय मंडळी यांच्या विचारातून झाली आहे त्यामुळे देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित मगच समाज सुरक्षित राहील असे प्रतिपादन महंत गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले . श्री ज्ञानेश्वरी रचना स्थान श्री क्षेत्र नेवासा येथे मिती जेष्ठ शुध्द एकादशी मंगळवार दि.१८ रोजी ह.भ.प.वेद शास्त्र संपन्न देविदास महाराज म्हस्के यांना श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सेवेचा पदभार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज हे होते. तर व्यासपीठावर ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत , ह.भ.प. मिराबाई महाराज मिरीकर, आमदार शंकररावजी गडाख. यांचे सह महाराज मंडळी उपस्थित होती.

प्रास्ताविकात श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान चे अध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले की, ह भ प म्हस्के महाराज यांच्या पदभार सोहळ्यास तालुक्यातील सर्व महाराज मंडळींनी अनुमती दिली आहे .त्याच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ काम करणार आहे .
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री मोहिनीराजांच्या, ज्ञानोबारायांच्या पुण्यभुमित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे सर्व ग्रामस्थ वारकरी यांचे देवस्थानला सहकार्य आहे. माऊली नेवाशाला आले श्री करवीरेश्वराच्या मंदिरात विसावले आणि इथेचं ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच धर्म शिकवितो असे उदात्त विचार याच भुमित निर्माण झाले. आपण निमित्त आहोत हे सर्व माऊली करून घेतात तांबे महाराज यांच्या त्यागातून हे मंदिर उभे राहीले आहे आपण माऊली सेवक आहोत आपल्या हातून हानी होऊ नये विश्वस्त मंडळ मालक नाही सेवक आहेत अध्यक्ष व विश्वास्त इंजिन आहे इंजिन शिवाय डबे ओडू शकत नाही.व्यवस्थे बरोबर अवस्थेची गरज अवस्था प्राप्त होणेसाठी त्यागमय जिवन जगावे लागते. आध्यात्मिक ओढ नसेल तर जीवनात कडू पणा निर्माण होतो.

महाराज

नेते मंडळी देवस्थानची व्यवस्था करण्यासाठी असतात त्याच्या अपार कष्टाने निधी मंजूर होतात आज मंदीराची सूत्रे दिली ते देखीलभविष्यात चांगले काम करतील ते ज्ञान देवीचे दास आहेत दुसऱ्या ला आनंद होऊल असे जो जगतो तो महंत असतो यापुढे देवस्थान चा विकास कराल हिच अपेक्षा करतो.

यावेळी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की आज गौरव पूर्ण कार्यक्रम आहे अनेक दिवसांपासून माऊली भक्त या दिवसांची वाट पहात होते आजच्या नियुक्ती बद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो या पदाबाबात सर्व नेवासकर यांनी स्वागत केलं फार दिवस हे पद मोकळं ठेवता येणार नव्हतं सर्व महाराज मंडळी च्या विचारातून हे पद देण्यात आले आहे.इथे विकासात्मक काम केली या गोष्टीवर समाधानी न रहाता आणखी निधी प्रामाणिक आणण्यासाठी प्रयत्न करेल ईथे प्रेमळ माणसं आहेत काही असतील खोडीशी मात्र काळजी नसावी नेवाशाची लोक चांगली आहे.असे गडाख म्हणाले.

श्री ज्ञानेश्वरीदास देविदास महाराज म्हस्के म्हणाले की , माझा प्राण जाईल पण कलंक लागणार नाही. असे कार्य या पवित्र ठिकाणी करेल गुरुंची व महाराज मंडळीची आज्ञा झाली आणी येथे आलो आणि आज हा पदभार स्वीकारला . गुरुकुला चा संकल्प आहे संत ज्ञानेश्वरानी चं इथं बोलावून घेतलं सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करू या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या ध्वनी लहिरी आज इथं आहेत हे पवित्र स्थान आहे. आध्यात्मिक विकास झाल्या शिवाय भौतिक विकास होत नाही. ज्या उद्देशाला घेऊन आलो तो ज्ञानदेवीचा दास सेवक बनुन काम करणार .

राऊत महाराज म्हणाले की,श्री संत ज्ञानेश्वरांचे हे मनुष्य प्राण्यानां दुःखातुन मुक्त करणार स्थान आहे .विश्वस्त त्यांचे काम करणार आहेत तुंम्ही भक्ती करा आध्यात्मिक काम सुरु ठेवा. हा काटेरी मुकुट आहे. ह.भ.प. मिराबाई महाराज मिरीकर म्हणाल्या की, आज योग्य व्यक्तीच्या हाती पदभार दिला आहे आज हि उपस्थिती आहे यातून दिसून येते या नियुक्ती साठी कोणीही विरोध दर्शविला नाही समाज चूक शोधत असतो समाजाने सहकार्य करावे वै. बन्सी बाबांच्या विचारधारेवर चालावे . या कार्यक्रमास अध्यक्ष , विश्वस्त मंडळ व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते .

महाराज
newasa news online
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज
error: Content is protected !!